‘Chat, how would I look in the 80s?’ अशा स्वरूपाच्या पोस्ट आणि Instagram वरील ‘Add Yours’ स्टिकरमुळे या ट्रेंडला मोठी लोकप्रियता मिळत आहे. विशेष म्हणजे हा केवळ फोटोवर विंटेज फिल्टर लावण्याचा प्रकार नाही. AI च्या मदतीने चेहऱ्याची ओळख कायम ठेवत कपडे, केसांची स्टाइल, अॅक्सेसरीज, प्रकाशयोजना आणि संपूर्ण पार्श्वभूमी बदलली जाते.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राला ‘टोकनाइज्ड’ राज्य बनविण्याच्या दिशेने पुढची पायरी मुंबई : फिनटेक क्षेत्रात भारताने केलेली प्रगती थक्क ...
या ट्रेंडमध्ये काही जण स्वतःला जुन्या हिंदी चित्रपटातील नायक-नायिकेच्या रूपात दाखवत आहेत, तर काही जण जुन्या कौटुंबिक अल्बम किंवा स्टुडिओ फोटोसारखी छायाचित्रे तयार करत आहेत. 80 च्या दशकातील रंगीत साड्या, मोठे दागिने, दाट हेअरस्टाइल, मिशा, हाय-वेस्ट कपडे आणि फिल्म कॅमेऱ्यासारखा ग्रेन असलेली छायाचित्रे विशेष चर्चेत आहेत. (AI Photo Trend)
हा फोटो तयार करण्यासाठी वापरकर्त्यांना ChatGPT मध्ये स्वतःचा स्पष्ट फोटो अपलोड करून त्यांना हवा असलेला 80s लूक सांगता येतो. उदाहरणार्थ, फोटोतील व्यक्तीची ओळख आणि चेहऱ्याची वैशिष्ट्ये कायम ठेवून 1980 च्या दशकातील भारतीय पोशाख, हेअरस्टाइल, दागिने आणि जुन्या स्टुडिओसारखी प्रकाशयोजना देण्याची सूचना करता येते. त्यानंतर तयार झालेल्या फोटोमध्ये पुन्हा बदल करण्यासाठी अतिरिक्त सूचना देता येतात. (80s Al Trend)
AI मुळे जुन्या काळातील आठवणी नव्या पद्धतीने अनुभवण्याची संधी मिळत असल्याने तरुणांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे Instagram वर सध्या 80s चा रेट्रो लूक आणि AI यांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. (Retro Look)
व्हायरल ट्रेंडचा Prompt
Transform my uploaded photo into an authentic 1980s Indian retro-style portrait while keeping my face, facial features, skin tone, and identity recognizable and natural.
Give me a classic 1980s Bollywood-inspired look with vintage fashion, voluminous hairstyle, subtle retro makeup, stylish accessories, warm film photography, soft studio lighting, rich colors, slight film grain, analog camera texture, realistic skin texture, gentle light leaks, subtle faded tones, and an authentic old-photo aesthetic.
Set the scene in a nostalgic 1980s Indian environment with vintage interiors and period-accurate styling. Make the photograph look like it was genuinely shot on an analog 35mm film camera in the 1980s, not digitally generated.
High detail, photorealistic, cinematic composition, natural facial expression, realistic proportions, authentic vintage photography, 4K quality.
Do not change my identity, facial structure, or distinctive features. Avoid modern clothing, modern backgrounds, excessive retouching, plastic skin, cartoon effects, or artificial-looking faces.