T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेच्या संघाची घोषणा, भारतीय खेळाडूंचा भरणा

मुंबई:आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(icc mens cricket world cup 2024) क्रिकेट चाहते अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. यावेळेस टी-२० वर्ल्डकप १ जूनपासून २९ जूनपर्यंत संयुक्त राज्य अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जात आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी सहयजमानपद निभावणाऱ्या अमेरिकेनेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय यूएसए संघाचे नेतृत्व मोनांक पटेल करत आहे. मोनांकचा जन्म गुजरातच्या आनंद शहरात झाला होता. मोनांकने अंडर १९ स्तरावर गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते मात्र त्यानंतर तो अमेरिकेत गेला.



उन्मुक्त-स्मितला मिळाली नाही जागा


मोनांक पटेलशिवाय भारतीय वंशाचे अनेक खेळाडू १५ सदस्यीय संघात आहेत. दरम्यान, उन्मुक्त चंदला संघात स्थान मिळालेले नाही. चंदच्या नेतृत्वात भारताने २०१२मध्ये अंडर १९ चा वर्ल्डकप जिंकला होता. विकेटकीपर फलंदाज स्मित पटेललाही संधी मिळालेली नाही.


 


संघात दोन उजव्या हाताच्या फलंदाजांचाही समावेश आहे. मिलिंदने २०१८-१९च्या रणजी ट्रॉफी सत्रात सिक्कीमचे प्रतिनिधित्व करताना १३३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्रिपुराचेही प्रतिनिधित्व केले. यानंतर तो चांगल्या संधीच्या शोधात अमेरिकेला गेला. २०२१मध्ये अमेरिकेत पदार्पण करण्याआधी तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स(आताची दिल्ली कॅपिटल) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.


टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेचा संघ - मोनांक पटेल(कर्णधार), आरोन जोन्स(उप कर्णधार), एंड्रीज गौस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली वान शल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.

रिझर्व्ह खेळाडू - गजानन सिंह, जुआनॉय ड्रिस्डेल, यासिर मोहम्मद.

Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला