Singapore News : कंपनी झाली मालामाल! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांच्या हाती चक्क ८ महिन्यांचा पगार

जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब


सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो आणि हा बोनस एक किंवा दोन महिन्यांचा असतो. मात्र एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ८ महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला आहे. या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा नफा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या स्वरुपात बोनस दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं नशीब चांगलंच उजळलं आहे. या गोष्टीची जगभरात तुफान चर्चा होत आहे.



सलग दुसऱ्या वर्षी कंपनीचा घसघशीत नफा


'सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड' असं या कंपनीचं नाव आहे. सिंगापूरमधील या सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ८ महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिल्याची माहिती मिळत आहे. सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला घसघशीत नफा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षाच्या कमाईपेक्षा यंदाच्या वर्षी कंपनीने अधिक नफा कमावला आहे. त्यामुळेच कंपनीने नफ्यामधून ६.६५ महिन्यांचा पगार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिला असून साथीच्या काळातील भरपाई म्हणून १.५ महिन्यांचा अतिरिक्त पगार प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात आला आहे.


आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या कंपनीने मागील वर्षापेक्षा २४ टक्के अधिक नफा कमवला आहे. कंपनीने कमवलेला नफा हा २.६७ बिलियन सिंगापूर डॉलर्स इतका आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार हा नफा १६,५३० कोटींहून अधिक रुपयांचा आहे. साथीच्या आजारानंतर परिस्थिती सर्वसामान्य होत असताना विमान प्रवासाची मागणी वाढत आहे. त्यामुळेच कंपनीला सातत्याने नफा होत आहे. कंपनीच्या कार्गे सेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यामध्ये या विमान कंपनीच्या ९७ टक्क्यांहून अधिक विमानं पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करत होते.



या कंपनीनेही कर्मचाऱ्यांना दिला पाच महिन्यांचा बोनस


केवळ सिंगापूर एअरलाइन्स नाही तर एमिरिट्स एअरलाइन्सनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचा बोनस दिला आहे. एमिरिट्सला ५.१ बिलियन अमेरिकी डॉलर्सचा नफा झाला त्यातून त्यांनी कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला.

Comments
Add Comment

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम