Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' निर्णयावर अमित शाह यांचा फडणवीसांना फोन!

काय झाला संवाद?


मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधानी राहावे लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३० जागांवर विजय मिळवला. यानंतर काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेत सरकारमधून मोकळं करण्याची विनंती पक्षनेतृत्वाकडे केली. पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत घोषणा केली. अनपेक्षित जागा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी दर्शवली आहे.


दरम्यान, त्यांच्या या निर्णयावर भाजपा पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही फडणवीसांशी बोलून पुन्हा एकदा एकत्र काम सुरु करु, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर अनेक नेत्यांनी महायुतीसाठी फडणवीसांच्या नेतृत्वाची गरज आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आता थेट केंद्रातून हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन संपर्क साधला. 'प्रत्यक्ष भेटून चर्चा करु', असं अमित शाह यावेळी त्यांना म्हणाले आहेत.


अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधत झालेल्या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसंच जे काही आहे त्याबाबत दिल्लीमध्ये भेटून सविस्तर बोलू, असं आश्वासनही त्यांना दिलं. उद्या भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीतच शाह व फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते फडणवीसांना काय मार्गदर्शन करतात, तसेच त्यांना पुन्हा एकदा राज्यात नेतृत्व करण्याची विनंती करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबठा गटावर घणाघात

दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा

Dadaji Bhuse : शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियान; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये काढणार चार दिवसांचा दौरा मुंबई : राज्यातील शाळांमधील मूलभूत

Shiv Sena party constitution : २०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले; सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद

४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती निवडणूक आयोगाच्या

jaykumar gore : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक; मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका

मुंबई : ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज बैठक घेऊन संबंधित मागण्यांचा

Mangal Prabhat Lodha : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना

• कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांशी संवाद मुंबई :

Mangal Prabhat Lodha : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एक महापालिका शाळा दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे; मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका