Dadaji Bhuse : शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियान; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये काढणार चार दिवसांचा दौरा


मुंबई : राज्यातील शाळांमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी केली. मुंबईतील बालभवन येथे आयोजित शिक्षण विभागाच्या ‘शिक्षण संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. बैठका आणि कागदी नियोजनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसले पाहिजे, असे स्पष्ट करत त्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन काम करण्याचे निर्देश दिले.



या कार्यशाळेस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागातील सर्व संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील आठही विभागांत वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, हे अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौऱ्यात शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या परिस्थितीचे मूल्यांकन करतील. शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि सुरक्षित परिसर या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जावे, तसेच बालवाटिका ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणिताचे मूलभूत कौशल्य भकम करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.



या उपक्रमांतर्गत चांगल्या काम करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन दिले जाईल, तर आवश्यक तिथे लोकसहभाग आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून तातडीने सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोषण आहार, गणवेश व विद्यार्थ्यांच्या सुविधांमध्ये कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान प्रधान सचिव देओल आणि आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनीही शाळा भेटींचे नियोजन आणि स्थानिक निधीचा प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील