Chhatrapati Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर!

शिवरायांच्या कारकिर्दीसह नव्या पैलूंचा उलगडा होणार


पॅरीस : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी, अप्रकाशित अशी प्राचीन बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा प्रारंभ आहे. पुण्यातील दोन संशोधकांना फ्रान्समधील 'नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स'मध्ये ही बखर सापडली आहे. त्यामुळे या बखरीतून शिवचरित्रातील अनेक नव्या पैलूंचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मोडी लिपीत बखर


फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर मोडी लिपीत आहे. हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर १७४० नंतर लिहिलेली आहे. छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत नमूद करण्यात आला आहे. विशेषत: यामध्ये अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे मारले? त्यावेळी कोण कोण लोक हजर होते? याचाही तपशील या बखरीमध्ये केला आहे.



कशी सापडली बखर?


इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर हे मूळचे कोल्हापुरचे आहेत. ते कोल्हापूरमधील शुक्रवार पेठेत राहायचे मात्र नोकरीनिमित्त मागील काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. तर मनोज दानी हे मूळचे पुण्यातील असून ते सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतात. या दोघांनाही इतिहास संशोधन लेखनाची प्रचंड आवड आहे. हे दोघेही ६ महिन्यांपूर्वी फ्रान्समधील बीएनएफ येथील हस्तलिखित स्वरुपातील जुनी कागदपत्रे पाहत होते. त्यावेळी या दोघांना मोडी लिपीतील काही कागदपत्रे दिसून आली. त्यांचा अभ्यास करत असताना त्यांना छत्रपती शिवरायांची ही जुनी अप्रकाशित बखर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.



९१ कलमी बखरीचा पूर्वसुरी दस्तऐवज


फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर चिमाजी आप्पांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजेच अंदाजे १७४० नंतर लिहिली गेली असावी असा अंदाज आहे. बखरीच्या शेवटी ही किताबत 'राजश्री राघो मुकुंद' यांची असे असा उल्लेख आहे. त्यामुळे ही बखर आतापर्यंत मिळालेल्या सर्व ९१ कलमी बखरीचा पूर्वसुरी दस्तऐवज आहे असा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे.



सापडलेल्या बखरीत 'या' गोष्टींचा उल्लेख



  • छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द.

  • छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ.

  •  छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाईसाहेब यांच्यातील संवाद.

  •  बोरीची काठी शिवाजी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होते आणि तिथे खांद्यावर कसा द्रव्य लाभ झाला.

  •  अफजलखानाला कसे मारले त्यावेळी कोण कोण लोक हजर होते.

  • छत्रपती संभाजी महाराज रायगडला आल्यानंतर त्यांनी तिथे असणारे सामान कशाप्रकारे ताब्यात घेतले.

  • विविध साधुसंतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटींचा संदर्भ.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा