मूनवली येथील तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

अलिबाग (प्रतिनिधी) : तालुक्यातील मूनवली येथील तलावात रविवारी २३ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास दोन मुलांचा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मूनवली पंचक्रोशीतील 8 मुलांचा ग्रुप मूनवली येथे वर्षासहलीसाठी आला होता. त्यातील अथर्व शंकर हाके (वय अंदाजे १६ वर्षे) व शुभम विजय बाला (वय अंदाजे १५ वर्षे) हे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.


सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील लोक धाऊन आले. पण त्या मुलांना वाचवू शकले नाहीत. या घटनेची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वांनी मुनवली तलावाकडे धाव घेतली.


सुरुवातीला पट्टीच्या पोहणाऱ्यांनी अथर्वा आणि शुभम यांना तलावात शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील अर्थवचा मृतदेह प्रथम हाती लागला, तर शुभमचा थोड्या उशिराने मृतदेह हाती लागला.या घटनेने मूनवलीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. हाके आणि बाली कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. अर्थव हाके हा मुनवली गावचा राहणारा, तर शुभम बाली हा तुडाल येथे राहत होता. शुभमचे पालक हे मोलमजुरी करीत असल्याचे समजते. याबाबत अलिबाग पोलिसांत नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि