Vicky Kaushal : कतरिना प्रेग्नंट आहे का? अखेर विकी कौशलने पॅपराझींच्या प्रश्नाला दिलं उत्तर!

लवकरच येणार 'ती' न्यूज...


मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या विविधांगी भूमिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे जोडपं सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा लंडनमध्ये फिरत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये विकी कतरिनाची काळजी घेताना दिसला होता. यामुळे कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, विकी कौशल आपल्या आगामी 'बॅड न्यूज' (Bad newz) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी आला होता, यावेळेस पॅपराझींनी अखेर त्याला याबाबत प्रश्न विचारलाच. यावेळेस विकीनेही मौन सोडलं आहे.


विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला जवळपास ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. बॅड न्यूज चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पॅप्सने विकी कौशलला विचारले, 'खरी गुड न्यूज कधी येणार आहे?' यावर विकी कौशलने आधी स्मित हास्य करत म्हटले की 'जेव्हा ती गुड न्यूज येईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन. सध्या आम्ही आणत असलेल्या 'बॅड न्यूज'चा आनंद घ्या. पण, त्या बातमीची वेळ आली की नक्की सांगेन', असेही विकीने म्हटले.



कधी रिलीज होणार 'बॅड न्यूज'?


धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती झालेल्या बॅड न्यूज चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. आनंद तिवारी यांनी यात अभिनेता म्हणूनही काम केले आहे. बॅड न्यूज हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. त्याचा ट्रेलरही लोकांना आवडला आहे. चित्रपटात विकी कौशल शिवाय तृप्ती डिमरी आणि एमी वर्क हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता