Virat Kohli : जगज्जेत्यांनाही कायदा समान; कोहलीच्या पबवर पोलिसांची मोठी कारवाई!

नेमकं प्रकरण काय?


बंगळुरु : राज्यात अनधिकृत पब्सचा मुद्दा गाजत असतानाच देशभरातही उशिरापर्यंत चालू असलेल्या बार, पब्सवर कारवाई केली जात आहे. कर्नाटकच्या (Karnataka)बंगळुरू पोलिसांनीही (Bengluru Police) रात्री उशिरापर्यंत पब सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई केली. अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीच्या (Virat Kohli) मालकीचे एक पबही आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील एमजी रोडवर 'वन 8 कम्युन पब' (One 8 commune pub) आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दिलेली वेळ संपूनही रात्री उशिरापर्यंत पब सुरु असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच डीसीपी सेंट्रलने एका निवेदनात म्हटले आहे की, रात्री मोठ्या आवाजात गाणी वाजवले जात असल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या आहेत.



पब मॅनेजरविरुद्ध एफआयआर दाखल


पब फक्त मध्यारात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, असेही पोलिसांनी सांगितले. यापेक्षा जास्त वेळ पब चालवता येत नाही. एमजी रोडवर स्थित 'वन 8 कम्युन पब' चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. ६ जुलै रोजी, वन 8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब कामकाजाच्या वेळेपलीकडे चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)