हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले; पेण तालुक्यातील भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हेटवणे धरणाच्या ६ दरवाज्यातून ५५ घमी / से एवढा पाण्याचा विसर्ग


पेण : पेण तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. हेटवणे धरणाच्या ६ दरवाज्यातून ५५ घमी / से एवढा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्याने पेण तालुक्यातील भोगावती नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेटवणे धरण भरल्याने पेण तालुका व नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हेटवणे धरणाची एकूण क्षमता १४७,४९ दशलक्ष घनमीटर एवढी आहे.


पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे २ फुटाने उघडले आहेत. दुपारी १ वाजता त्यातून ५५ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने यावर प्रकल्प अधिकारी व सहायक अधिकारी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. धरणाचे दरवाजे केवळ सावधानता म्हणून उघडण्यात आले असल्याची माहिती हेटवणे धरणाचे उपविभागीय अभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली आहे.


या पार्श्वभूमीवर पेणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार व पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा शरणकुमार लिंबाळे यांच्याकडे; निवडणुकीविना ऐतिहासिक निवड!

पुणे: 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 28 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2027 दरम्यान पुण्यातील सावित्रीबाई फुले

नोएडातील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना! इमारतीच्या 19व्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

उत्तर प्रदेश: नोएडा शहरातील सेक्टर-39 पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लोटस बुलेवार्ड सोसायटीमध्ये मंगळवारी

येत्या गुरुवारी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत घेतला जाणार 24 तासांचा पाणीब्लॉक, कोणकोणत्या परिसरात बंद असेल पाणी पुरवठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गाव दरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील

Explainer: पश्चिम बंगालच्या नामांतराची चर्चा, राज्याचं नाव बदलण्याची घटनात्मक प्रक्रिया काय?; वाचा A टू Z माहिती

मुंबई: 2001 मध्ये कलकत्त्याचे नाव बदलून कोलकाता केल्यानंतर आता, पंचवीस वर्षांनंतर 'पश्चिम बंगाल' राज्याचे नाव

MPSC पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार आयोगातीलच अधिकारी, 300 प्रश्न लॅपटॉपवर टाईप केल्याचा आरोप; सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात आयोगातीलच

Panchayat 5 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, रिंकु आणि सचिवची लव्हस्टोरी बहरणार; 'फुलेरा'तील स्थानिक राजकारण बदलणार

मुंबई: बहुप्रतिक्षित 'पंचायत'च्या पाचव्या सीझनचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या 3 डिसेंबर 2026 रोजी,