Antim Panghal : भारताला दुहेरी धक्का! कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणींच्या विळख्यात

शिस्तभंगाचा आरोपामुळे दिले पॅरिस सोडण्याचे आदेश


पॅरिस : काल पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) विनेश फोगाटला (Vinesh Phogat) कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी १०० ग्राम अधिक वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. यामुळे देशभरात नाराजी पसरली आहे. विनेश फोगाट प्रकरणाने देश हळहळत असताना आता आणखी एक बातमी समोर आली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल (Antim Panghal) अडचणीत सापडली आहे. अंतिम पंघालवर शिस्तभंगाचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे तिला थेट पॅरिस सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. एकीकडे विनेश फोगाटला अपात्र ठरवणे तर दुसरीकडे अंतिम पंघालवर कारवाई करत असल्यामुळे भारताला दुहेरी धक्का बसत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महिला कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिमच्या बहिणीला चुकीचे ओळखपत्र दाखवून ऑलिम्पिक कॅम्पसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडले. त्यामुळे तेथील फ्रेंच अधिकाऱ्यांकडून तिच्यावर शिस्तभंगाचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची भारतीय ऑलिम्पिक संघटनेने गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर भारतीय कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहिण आणि सपोर्ट स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



नेमकं प्रकरण काय?


महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील आपला पहिला सामन्यात गमावल्यानंतर कुस्तीपटू अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली. तिचे नामांकित प्रशिक्षक भगतसिंह आणि वास्तविक प्रशिक्षक विकास ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे ती गेली. तिने आपल्या बहिणीला स्वतःचे ओळखपत्र दिले आणि जिथे सामना होता, तिथून आपले सामान आणण्यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे अंतिमची बहीण अंतिमचे ओळखपत्र घेऊन स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली, मात्र अंतिमचे सामान घेऊन परतताना तिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले.


त्यानंतर अंतिमच्या बहिणीची पोलिसांनी चौकशी केली आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यासाठी १९ वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटू अंतिमलाही तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावले. यातच अंतिमचे वैयक्तिक सपोर्ट स्टाफ विकास आणि भगत कथितरित्या पॅरिसमध्ये मद्यधुंद अवस्थेत टॅक्सीमधून फिरत होते. मात्र त्यांनी टॅक्सीचे भाडे देण्यास मनाई केली, यामुळे ड्रायव्हरने पोलिसांना बोलावले. त्यामुळे अंतिमच्या अडचणींत आणखी भर झाली.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे