विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबई विमानातील कथित अपहरणाच्या प्रयत्नाच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान यूएई पोलिसांनी मालदीवच्या दोन वैमानिकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि खळबजनक बातमी समोर आली आहे. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) पोलिसांनी या कटाशी संबंधित असल्याच्या संशयावरून फ्लाय दुबईसाठी काम करणाऱ्या मालदीवच्या दोन वैमानिकांना (Pilots) अटक केली आहे.



काय आहे नेमके प्रकरण?


गत 30 सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीव जाणारे विमान हायजॅक करून ते कोसळवण्याचा एक कथित प्रयत्न करण्यात आला होता. ओमानचा नागरिक आणि या विमानाचा सहवैमानिक हम्माम अल-हम्मामी याने विमानाचा ताबा मिळवण्याच्या उद्देशाने मुख्य वैमानिक (कॅप्टन) यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला होता. मात्र, मुख्य वैमानिकाने प्रसंगावधान राखत हा मोठा घातपात हाणून पाडला होता.



मालदीवच्या वैमानिकांवर संशय का?


तपासाची व्याप्ती वाढवल्यानंतर यूएई पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी मालदीवच्या या दोन्ही वैमानिकांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अटक करण्यात आलेले दोन्ही वैमानिक मुख्य आरोपी सहवैमानिक अल-हम्मामी याच्या संपर्कात होते. एवढेच नव्हे तर, ते सर्वजण एकाच इमारतीत राहत असल्याचा संशय आहे. या दोन्ही वैमानिकांचे अल-हम्मामीसोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर जवळचे संबंध असल्याचे सांगितले जात असून, त्यांच्याकडे फ्लाईट ड्युटीच्या शिफ्ट्सही सोबत असल्याचा दावा केला जात आहे.



दूतावासाकडून दुजोरा, अधिकृत माहिती प्रतीक्षेत


यूएईमधील मालदीवच्या दूतावासाने या वैमानिकांच्या अटकेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना अधिकृतपणे दिली आहे. मात्र, या प्रकरणातील त्यांचा नेमका सहभाग किंवा त्यांच्याविरोधातील पुराव्यांबाबत यूएई किंवा मालदीवच्या प्रशासनाकडून अद्याप कोणतीही सविस्तर अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या गंभीर घटनेमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली असून तपास यंत्रणा यामागील मोठ्या कटाचा कसून शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे

पनामात पुन्हा धरणीकंप, 6.1 तीव्रतेच्या भूकंपाने मध्य अमेरिका हादरली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पनामा : मध्य अमेरिकेतील पनामा देशात दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच, मंगळवारी (13

Nobel Prize 2026 : अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर! कोण आहेत रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड?

स्टॉकहोम:

Panama Earthquake : पनामा भूकंपाने हादरले 9 देश! आता त्सुनामीचा इशारा; नेमकं काय घडलं?

पनामामध्ये शुक्रवारी सकाळी 7.6 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यामुळे मध्य आणि दक्षिण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली

Trump Putin : ट्रम्प यांची रशियासोबत मोठी डील! अमेरिकेत इंधनदर कमी करण्यासाठी 50 लाख टन डिझेल पुरवठ्याची घोषणा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वाढत्या इंधनदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

भारतीय वंशाच्या नावनेथम नावी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार, त्यांची निवड कशी झाली? जाणून घ्या

नोबेल शांताता 2026 पुरस्कार कोणाला मिळणार? याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून होती. कारण अमेरिकेचे