Kamala Mills Fire : अग्नितांडव! मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग

परिसरात धुराचे लोट; आगीचे कारण अस्पष्ट


मुंबई : काही दिवसांपूर्वी बोरिवली येथील २२ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत ४ नागरिक जखमी झाले होते. तर त्यातील एका वृद्ध नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुंबईतील (Mumbai News) आगीची ही घटना ताजी असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील लोअर परेल परिसरातील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग (Mumbai Kamala Mills Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान लोअर परेल येथील कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरवरील एका मजल्याला अचानक आग लागली. काही क्षणातच मोठा भडका उडाल्यामुळे या आगीने रौद्र रुप धारण केले. संपूर्णरित्या ही काचेची बिल्डिंग असल्यामुळे आगीचा धूर आतमध्ये सर्व मजल्यांपर्यंत गेला. त्यानंतर धूर बाहेर जाण्यासाठी बिल्डिंगच्या काचा देखील फोडण्यात आल्या.


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आणखी तीन गाड्या मागवण्यात आल्या. शर्थिच्या प्रयत्नानंतर टाईम्स टॉवरला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही.

Comments
Add Comment

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करावा 

मंत्री आदिती तटकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय

Government Canteens : चहा-समोसा विसरा! सरकारी बैठका आणि उपहारगृहांमध्ये आता पौष्टिक मेन्यू

मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय उपहारगृहे तसेच सरकारी बैठका आणि विविध कार्यक्रमांमध्ये आता आरोग्यदायी

Mumbai Sawantwadi Daily Express : मुंबई-सावंतवाडी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून दैनंदिन एक्सप्रेस सेवा सुरू

मुंबई : कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज

Ganeshotsav Mandal : मुंबईतील प्रत्येक श्रीगणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना मिळणार प्रशिक्षण मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सार्वजनिक

BMC Expenditure Audit : महापालिका कार्यालय, विभागांमध्ये लाखो रुपयांच्या खर्चाचा स्वैराचार

- मागील एक वर्षांच्या खर्चाचे ऑडीट करा; स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत विभाग

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होणार?

आयुक्तांनी नगरविकास खात्याला पाठवले पत्र, न्यायालयानेही याचिका फेटाळली पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवता