रायगड आणि नांदेडमध्ये भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

मुंबई : रायगडच्या पाली-खोपोली महामार्गावर आज भीषण अपघात घडला. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. कानसळ गावाजवळ स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.


पाली-खोपोली महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी घडलेला हा मोठा अपघात आहे. कालही या महामार्गावर एसटी बस आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले तर बस पलटी झाली होती. त्यातून ४८ एनसीसी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.


दुसरीकडे, नांदेडच्या कंधार-जळकोट राष्ट्रीय महामार्गावर फॉर्च्यूनर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. कंधार तालुक्यातील दत्तात्रेय मांनस्पुरे आणि शेख मगदुम यांचा जागीच मृत्यू झाला. फॉर्च्यूनर कारमधील एक व्यक्ती जखमी झाला आहे.


दरम्यान, सोलापूरच्या माढा परिसरात बार्शी-माढा एसटी बसचा ब्रेक फेल झाला होता. मात्र चालक केदारे बाबुराव नरवडे यांच्या सतर्कतेमुळे बस मुरुमाच्या ढिगाऱ्यावर नेऊन थांबवली गेली. त्यामुळे अपघात टळला आणि ३० प्रवाशांचा जीव वाचला.

Comments
Add Comment

Central Railway: मध्य रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा; अहिल्यानगर-येवला विभागात 'कवच 4.0' ची सुरक्षा तपासणी यशस्वी!

मुंबई: मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक मोठी मजल मारली आहे. दिनांक 24 आणि 25 ऑक्टोबर

अहिल्यानगरमध्ये ग्रीन वेस्ट डम्पिंग यार्डला भीषण आग! परिसरात धुराचे साम्राज्य; उपमहापौरांचे कडक निर्देश

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील वारूळाचा मारुती परिसरातील कल्याण रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या

अहिल्यानगरमध्ये खळबळ! सुरभी हॉस्पिटलच्या संचालकांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथील छत्रपती संभाजीनगर रोडवरील सुरभी हॉस्पिटल्स प्रा. लि. कंपनीच्या

पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

पुणे: पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना

अहिल्यानगरमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन; पशुधनाच्या सर्वेक्षणासह चारा लागवडीला वेग

जिल्ह्यामध्ये सध्या दीड ते दोन महिने पुरेल इतका चारा शिल्लक असून, संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा: शिवसेनेकडून 24 ट्रक्सद्वारे धाराशिवला दिवाळीचा शिधा रवाना

राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारसोबतच शिवसेनाही पूर्ण ताकदीने