दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा: शिवसेनेकडून 24 ट्रक्सद्वारे धाराशिवला दिवाळीचा शिधा रवाना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना कडक इशारा

राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारसोबतच शिवसेनाही पूर्ण ताकदीने बळीराजाच्या पाठीशी उभी राहिली आहे. ‘जिथे आपत्ती, तिथे मदत’ या भूमिकेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यासाठी २४ ट्रक भरून दिवाळीचा शिधा रवाना करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.


शिवसेनेचे कार्यकर्ते धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या घराघरांत जाऊन या साहित्याचे प्रत्यक्ष वाटप करतील. या मदत साहित्यात बेसन, साखर, रवा, मैदा, तूप, रांगोळी, पणत्या आणि शिवसेनेची खास दिनदर्शिका समाविष्ट आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलतींशिवाय बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून ५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल. अन्नधान्याव्यतिरिक्त दुष्काळग्रस्त भागात चारा, पाण्याचे टँकर, पाण्याच्या टाक्या पुरवण्यावर भर दिला जाईल. तसेच, आर्थिक अडचणींमुळे मुलींची लग्ने खोळंबलेल्या कुटुंबांनाही शिवसेनेकडून मदत केली जात आहे.



संकटाच्या काळात शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका आणि सावकारांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला. असा त्रास झाल्यास त्वरित सरकार, प्रशासन किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाच्या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, मराठवाडा समन्वयक बाजीराव चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai News: क्रॉफर्ड मार्केटच्या ऐतिहासिक वास्तूचे आणि वारसा स्थळाचे महत्त्व जपा! महापौर रितू तावडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक व जागतिक

testing live blog

लॅपटॉप लॉगआउट, सिस्टिम सुद्धा बंद; Innodata कंपनीतील 550 कर्मचाऱ्यांना नारळ

नवी दिल्ली: AI आल्यापासून IT सह अनेक वेगवेगळ्या इंडस्ट्रीतील नोकऱ्या गेल्या आहेत. आता डेटा इंडस्ट्रीमध्ये सेवा

Chandrakant Patil: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरकारकडून दिलासा, 26 विद्यापीठांतील 5 लाख विद्यार्थ्यांसाठी 'झिरो चलन' सुविधा उपलब्ध

मुंबई: संपूर्ण राज्यावर दुष्काळाचं सावट घोंगवतंय. महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळून निघत असताना सरकारकडून

Greater Noida Case: आधीच रचला होता कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचा कट ? ग्रेटर नोएडा प्रकरणातील गुढ वाढलं

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये आज सकाळी मन हेलावून टाकणारी घटना घडलीये. या घटनेमुळे फक्त

Dattatray Bharne: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीसाठी कोणत्याही अटी नाही, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीसाठी