पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, प्रशासनाला आतापासूनच उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे: पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पाणी उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई आणि आगामी काळातील पाणी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. तसेच शेती आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करताना, पुणे महानगरपालिकेने उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून प्रभावी नियोजन करावे, असे सांगण्यात आले. तसेच पुणे महानगरपालिकेला 13 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.



यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि अधिकार्यांनी लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुष्काळाच्या काळातील पाणी नियोजनाच्या कार्याची आवर्जून आठवण केली. अजितदादा ज्या पद्धतीने दुष्काळी परिस्थितीत काटेकोर नियोजन करायचे, त्याच धर्तीवर पाणी व्यवस्थापन करावे, अशी आग्रही मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावर त्यांनी याविषयी सविस्तर माहिती घेऊन त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन बैठकीच्या शेवटी करण्यात आले.

Comments
Add Comment

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा: शिवसेनेकडून 24 ट्रक्सद्वारे धाराशिवला दिवाळीचा शिधा रवाना

राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारसोबतच शिवसेनाही पूर्ण ताकदीने

ॲग्रीगेटर कंपन्यांवर AI ची नजर! मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे निर्देश

राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ॲग्रीगेटर

ओला-उबरच्या मनमानीला चाप बसणार; स्वतंत्र टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील अ‍ॅप-आधारित प्रवासी वाहतूक क्षेत्रात स्वतंत्र टॅक्सी चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य

मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीसाठी नितेश राणेंचे निर्देश; जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 28 ऑक्टोबर 2026 पासून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर

वर्ध्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठी चालना; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत 2100 कोटींचा सामंजस्य करार

राज्यातील कृषी, अन्नप्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उद्योगांना मोठी चालना देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात

अखेर प्रतीक्षा संपली! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचे मोठे निर्देश

मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणात लवकरच प्रचाराचा धुरळा उडणार आहे! ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे