अहिल्यानगरमध्ये खळबळ! सुरभी हॉस्पिटलच्या संचालकांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा

अहिल्यानगरमधील सुरभी हॉस्पिटल्स प्रा. लि. कंपनीशी संबंधित 2 कोटी 74 लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणी डॉ. राकेश गांधी आणि इतर संचालक व संबंधित व्यक्तींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णांच्या बिलांच्या नोंदी, रोख व्यवहार आणि कंपनीच्या निधीच्या वापराबाबत तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथील छत्रपती संभाजीनगर रोडवरील सुरभी हॉस्पिटल्स प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची आणि कंपनीची तब्बल 2 कोटी 74 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात डॉ. राकेश कांतीलाल गांधी व इतर संचालक व संबंधितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमित रसिकलाल कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


फिर्यादीत दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 07 डिसेंबर 2017 ते 31 मार्च 2023 या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार घडल्याचे समोर आले आहे. सुरभी हॉस्पिटलची स्थापना 2017 मध्ये झाली असून, कंपनीच्या सुरुवातीच्या संचालक मंडळात डॉ. राकेश कांतीलाल गांधी, डॉ. आशिष अजित भंडारी, इम्रान शफी शेख, अमित नागनाथ पवळे, सुनील ज्ञानदेव आवारे, विनायक जगन्नाथ शिंदे, विजय माणिकराव निकम व विलास सखाराम व्यवहारे यांचा समावेश होता. कंपनीचे संचालक व पदाधिकाऱ्यांनी उच्च परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून व कंपनीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करून घेतली.



दरम्यान, कंपनीच्या कायदेशीर ऑडिट रिपोर्ट व फॉरेन्सिक ऑडिट अहवालाचे अवलोकन केले असता, कंपनीच्या बँक खात्यांचा अधिकार असलेल्या संचालकानी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट दस्तावेज तयार केल्याचे व आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले. आयपीडी विभागातील 230 रुग्णांच्या बिलांची नोंद हॉस्पिटलच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये न दाखवता, तसेच कोविड काळातील व इतर रुग्णांच्या उपचारापोटी मिळालेली रोख रक्कम स्वतःकडे ठेवून कंपनीची जवळपास 2 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तसेच, समृद्धी हेल्थकेअर नावाच्या फर्मसोबत बेकायदेशीर सामंजस्य करार करून कुठलीही सेवा न देता स्वतःच्या व कुटुंबाच्या फायद्यासाठी कंपनीचा निधी वापरण्यात आला.


या शिवाय, कंपनीचे रेकॉर्ड, पावत्या आणि आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये कंपनीचे सर्व रेकॉर्ड स्वतःच्या घरी नेऊन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता तसेच जुन्या भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये कलम 409, 420, 467, 468, 471, 201 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करत आहेत.

Comments
Add Comment

अहिल्यानगरमध्ये ग्रीन वेस्ट डम्पिंग यार्डला भीषण आग! परिसरात धुराचे साम्राज्य; उपमहापौरांचे कडक निर्देश

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील वारूळाचा मारुती परिसरातील कल्याण रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या

पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

पुणे: पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना

अहिल्यानगरमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन; पशुधनाच्या सर्वेक्षणासह चारा लागवडीला वेग

जिल्ह्यामध्ये सध्या दीड ते दोन महिने पुरेल इतका चारा शिल्लक असून, संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा: शिवसेनेकडून 24 ट्रक्सद्वारे धाराशिवला दिवाळीचा शिधा रवाना

राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारसोबतच शिवसेनाही पूर्ण ताकदीने

ॲग्रीगेटर कंपन्यांवर AI ची नजर! मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे निर्देश

राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ॲग्रीगेटर

ओला-उबरच्या मनमानीला चाप बसणार; स्वतंत्र टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील अ‍ॅप-आधारित प्रवासी वाहतूक क्षेत्रात स्वतंत्र टॅक्सी चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य