इंदिरानगर परिसरात एकाच कुटुंबातील तीन जणांची आत्महत्या

सिडको : इंदिरा नगर परिसरातील सराफ नगर लेन क्रमांक दोन मध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून घरात सुसाईड नोट आढळून आलेली नाही. नाशिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.


अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पती-पत्नी व नववर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे. विजय सहाने (३६) पत्नी ज्ञानेश्वरी सहाणे (३२), नात अनन्या अशी मृतांची नावे आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार विजय सहाने हे एका खाजगी कर्मचारी कामाला होते. ते वडील माणिक सहाने व आई लिलाबाई यांच्या समवेत दुमजली प्रतिगंगा रो हाऊस क्रमांक एकमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नात अनन्या शाळेत जाण्यासाठी खाली न आल्याने माणिक सहाने वरच्या मजल्यावर गेले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी आवाज दिला बराच वेळ झाला तरी कोणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी रो हाऊस सामोरील ओळखीच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले.


नागरिकांनी दरवाजा उघडण्यास प्रयत्न केला तरी दरवाजा उघडला नाही शेवटी दूध वाल्याने दरवाजा तोडला माणिक सहाने व नागरिकांनी खोलीत प्रवेश केला असता त्यांना तिघेजण मृत अवस्थेत दिसून आले.


घरात आरडाओरडा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ सहाणे यांच्या घराकडे धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनी सोबत आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सहानी कुटुंब हे मूळचे गौळणे येथील आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास इंदिरा नगर पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

Nashik : धक्कादायक ! ऊसतोड सुरू असताना बिबट्याचा महिलांवर हल्ला, दोन महिला गंभीर जखमी

सिन्नर : शेतात ऊसतोड सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोन महिला मजुरांवर हल्ला केल्याची धक्कादायक

Nashik Crime : मुला-मुलींच्या छळाला कंटाळून सेवानिवृत्त RTO अधिकाऱ्याची आत्महत्या ? चौघांविरोधात गुन्हा

नाशिक : मुलांना लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले; मात्र त्यांच्याकडूनच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ होत असल्याचा

Nashik Accident News : कोपरगावमध्ये भीषण अपघात, सिन्नरच्या दोन युवकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : लग्नकार्य असो किंवा एखादं धार्मिक काम... घरातून बाहेर पडलेली तरुण मुलं सुखरूप परत यावीत, हीच प्रत्येक

Nashik Crime : पत्नीच्या खुनाचा खोटा कॉल करणं पडलं महागात ! पतीविरोधात गुन्हा दाखल

दिंडोरी: नाशिकच्या दिंडोरीमध्ये एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नीचा खून झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.

नाशिककरांनो लक्ष द्या ! जेल रोडसह मुक्तिधाम आणि देवळाली कॅम्प परिसरात 'या' दिवशी वीजपुरवठा बंद

नाशिक : नाशिक शहरातील काही भागांतील वीजपुरवठा रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) सहा तास बंद राहणार आहे. महावितरणकडून पंचक,

Nashik : TCS प्रकरणातील निदा खानच्या संसारात वादळ ! संसार वाचवण्यासाठी निदाची धडपड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसरे समुपदेशन

नाशिक : टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निदा एजाज खान (वय २६) हिच्या