धमकी दिल्याप्रकरणी बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी

नाशिक : सिडकोतील भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करून उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि या व्यक्तीने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करू नये अशी मागणी केली.


या सर्व प्रकरणावरती आज गुरुवारी मुकेश शहाणे यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी झालेल्या घटनेबाबत चर्चा केली. यावेळी सिडको परिसरातील भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.


माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी याबाबत बोलताना सांगितले की सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांना सांगून हा फोन केला आहे. यामध्ये दोन सराईत गुंडांची देखील नावं असून त्यांच्यावर देखील कारवाई करावी या मागणीसह त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Nashik Accident News : कोपरगावमध्ये भीषण अपघात, सिन्नरच्या दोन युवकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : लग्नकार्य असो किंवा एखादं धार्मिक काम... घरातून बाहेर पडलेली तरुण मुलं सुखरूप परत यावीत, हीच प्रत्येक

Nashik Crime : पत्नीच्या खुनाचा खोटा कॉल करणं पडलं महागात ! पतीविरोधात गुन्हा दाखल

दिंडोरी: नाशिकच्या दिंडोरीमध्ये एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नीचा खून झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.

नाशिककरांनो लक्ष द्या ! जेल रोडसह मुक्तिधाम आणि देवळाली कॅम्प परिसरात 'या' दिवशी वीजपुरवठा बंद

नाशिक : नाशिक शहरातील काही भागांतील वीजपुरवठा रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) सहा तास बंद राहणार आहे. महावितरणकडून पंचक,

Nashik : TCS प्रकरणातील निदा खानच्या संसारात वादळ ! संसार वाचवण्यासाठी निदाची धडपड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसरे समुपदेशन

नाशिक : टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निदा एजाज खान (वय २६) हिच्या

Nashik : येवला रेल्वे स्थानकावर 12.56 कोटींचा बंदिस्त मालधक्का व खत रॅक पॉईंट मंजूर

नाशिक : राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला-लासलगाव

Nashik : अस्वच्छतेचा ठपका ! नाशिक शहरातील चार हॉटेलचे परवाने निलंबित

नाशिक : अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागाने शहरातील