Nashik : येवला रेल्वे स्थानकावर 12.56 कोटींचा बंदिस्त मालधक्का व खत रॅक पॉईंट मंजूर

येवला रेल्वे स्थानकावर बंदिस्त मालधक्का व खत रॅक पॉईंट उभारणीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू, २०२७-२८ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार ; कृषी माल वाहतूक आणि खत पुरवठ्याला मिळणार मोठी चालना; शेतकरी, व्यापारी व नागरिकांना दिलासा

नाशिक : राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला-लासलगाव मतदारसंघासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी येवला रेल्वे स्थानकावर बंदिस्त मालधक्का (Covered Goods Shed) व खत रॅक पॉईंट (Fertilizer Rake Point ID 1451) उभारण्याच्या मान्यता मिळाली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी १२.५६ कोटी रुपयांचा निधी मंजूरकेला असून कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२७-२८ या आर्थिक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने निश्चित केले आहे.


या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्री छगन भुजबळ यांनी १७ मार्च २०२५ रोजी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच येवला परिसरातील खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी २० सप्टेंबर २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे केली होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत मध्य रेल्वे महाप्रबंधक कार्यालयाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे प्रकल्पास मंजुरी दिली आहे.


येवला रेल्वे स्थानकावर ३५० मीटर लांबी व १५ मीटर रुंदीचे काँक्रीटीकरणासह बंदिस्त शेड, ६०० मीटर लांबीची गटार व्यवस्था, ९०० मीटर संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सुविधा, ४५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तसेच हायमास्ट व पथदिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे.






या प्रकल्पामुळे येवला व नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कृषी माल देशांतर्गत बाजारपेठेत तसेच निर्यातीसाठी पाठविण्याची अधिक सक्षम सुविधा उपलब्ध होणार आहे. बंदिस्त मालधक्क्यामुळे माल हाताळणी व साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर खत रॅक पॉईंट कार्यान्वित झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते वेळेत उपलब्ध होऊन खत पुरवठा साखळी अधिक मजबूत होणार आहे.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात मनमाड रेल्वे स्थानकावरील मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठीही येवला येथील मालधक्का महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होऊन कृषी आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी मंजूर करून आवश्यक कार्यवाही सुरू केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्र सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. येवला परिसराच्या कृषी, व्यापार व आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi attack on Congress : “काँग्रेसने फक्त ‘गरिबी हटाव’चा जप केला, आम्ही १२ वर्षांत ५० कोटींना गरिबीतून बाहेर काढले”; वैशालीतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी बिहारमधील वैशाली जिल्ह्यात आयोजित जाहीर सभेतून काँग्रेसच्या

Avinash Isha Breakup Rumours: आधी अनफॉलो, आता एकत्रचे फोटोही डिलीट! ईशा-अविनाशच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Avinash Isha Breakup Rumours: बिग बॉस 18च्या घरात टीव्ही अभिनेता अविनाश मिश्रा आणि अभिनेत्री ईशा सिंग दोघांना लोकप्रियता मिळाली.

Nashik : अस्वच्छतेचा ठपका ! नाशिक शहरातील चार हॉटेलचे परवाने निलंबित

नाशिक : अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागाने शहरातील

Prachi Desai: दीड वर्षांनंतर प्राची देसाई सोशल मीडियावर परतली! ‘Proof of existence’ म्हणत शेअर केले फोटो

[caption id="attachment_1077497" align="alignnone" width="800"] अभिनेत्री प्राची देसाई एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर सोशल मीडियावर परत आली आहे, तिने

Nashik Crime : इन्स्टाग्रामवर ड्रेसची रील पाहून ड्रेस ऑर्डर केला अन् तरुणीला 99 हजारांचा ऑनलाइन गंडा बसला , नेमकं काय घडलं ?

नाशिक : सोशल मीडियावर आकर्षक ड्रेसची रील पाहून ऑनलाइन खरेदी करणे सिडको परिसरातील एका तरुणीला चांगलेच महागात

Anti-Narcotics Van: अमली पदार्थांविरोधी मोहिमांसाठी मुंबई पोलिसांना ‘अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’

मुंबई : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासह गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई