Haryana Elections : भाजपाच्या जाहीरनाम्यात २० आश्वासने तर काँग्रेसने दिली जनतेला ७ आश्वासने!

हरियाणात भाजपा देणार २ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या, विद्यार्थ्यांना स्कूटर, महिलांना दरमहा २१०० रुपये


काँग्रेस देणार २ लाख तरुणांना सरकारी नोकरी तसेच ५ लाख तरुणांना रोजगाराच्या इतर संधी, शिवाय प्रत्येक कुटुंबासाठी १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार


रोहतक : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Elections) भाजपाने आज, गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. हे संकल्पपत्र पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री नायब सैनी यांनी रोहतक येथे जारी केले.


भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात हरियाणातील २ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सर्व महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील. तसेच 'घर गृहिणी योजने'च्या माध्यमातून ५०० रुपयांना सिलिंडर दिला जाईल. पेन्शनमध्ये वाढ केली जाईल, नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणार, ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूटर दिल्या जातील, हरियाणाला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवणार. याशिवाय इतरही अनेक आश्वासने भाजपाने दिली आहेत.


दुसरीकडे काँग्रेसने हरियाणातील जनतेला ७ आश्वासने दिली आहेत. काँग्रेसच्या संकल्प पत्रानुसार राज्यात सरकार आल्यास महिलांना लाडो लक्ष्मी योजनेंतर्गत २१०० रुपये दिले जातील. शहरी आणि ग्रामीण भागात ५ लाख घरे, एमएसपीवर घोषित झालेल्या २४ पिकांची खरेदी केली जाईल. प्रत्येक कुटुंबासाठी १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळेल. राज्यातील २ लाख तरुणांना सरकारी नोकरी तसेच ५ लाख तरुणांना रोजगाराच्या इतर संधी आणि नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन योजनेतून मासिक स्टायपेंड दिले जाईल. लहान मागास जातींसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळे बनवणार. निवृत्ती वेतनामध्ये वाढ करणार. दक्षिण हरियाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अरवली जंगल सफारी पार्क बनवणार. देशातील कोणत्याही सरकारी महाविद्यालयातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ओबीसी आणि एससी प्रवर्गातील हरियाणातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यासोबतच राज्य सरकार ओबीसी श्रेणीतील उद्योजकांसाठी मुद्रा योजनेव्यतिरिक्त २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची हमी देणार असून प्रत्येक जिल्ह्यात ऑलिम्पिकच्या खेळांसाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane Statement: हिंदूराष्ट्रात ‘टिप्या’चे उदात्तीकरण सहन करणार नाही; मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : “ज्या ‘टिप्या’ने आपल्या राजवटीत लाखो हिंदूंची हत्या केली, धर्मांतरे घडवून आणली आणि हिंदू महिलांवर जुलमी

Mumbai Bank Election : मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी; सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, सोशल मिडिया इन्फ्लुएंसर्स अन्...

उत्तर प्रदेश: मथुरेमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन दिवसीय बैठकीनंतर, पक्षाने उत्तर प्रदेश

Dr. Vikhe Patil : मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यास गप्प बसणार नाही, रोहित पवारांच्या आरोपांना डॉ. विखे पाटील यांचे प्रत्युत्तर; तीन सवाल केले उपस्थित

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अखिलेश यादवांच्या रोड शोमध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सपावर जोरदार हल्लाबोल

उत्तर प्रदेशात निवडणुका जवळ आल्या असताना समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गोरखपूरमध्ये बुधवारी

'तुमच्या चाचा आझम खान यांना फक्त जामीन मिळालाय...' केशव प्रसाद मौर्य यांचा अखिलेश यादवांवर जोरदार हल्ला!

लखनऊ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या