Mumbai Bank Election : मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार

- भाजप, शिवसेनेच्या बैठकीत निर्णय; जागावाटपाबाबत फडणवीस आणि शिंदे अंतिम निर्णय घेणार

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून ‘सहकार पॅनेल’ स्थापन करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत यावर सहमती झाली. मात्र, पॅनेलमधील जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.






शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या दालनात ही बैठक झाली. या बैठकीला भाजपचे नेते प्रवीण दरेकर, शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याऐवजी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार सहकार पॅनेलच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवतील. जागावाटपाबाबत मात्र अद्याप चर्चा पूर्ण झालेली नाही. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर जागावाटप निश्चित केले जाणार आहे.


दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेकडून स्वतंत्रपणे पॅनल उभे करण्याची चाचपणी सुरू होती. पाडव्याच्या मुहूर्तावर बाळासाहेब भवन येथे यासंदर्भात बैठकही झाली होती. या बैठकीला उपसभापती सचिन अहिर, उपमहापौर संजय घाडी, मंगेश सातमकर यांच्यासह मुंबईतील विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना भाजपपासून वेगळी भूमिका घेत निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चांना विराम मिळाला आहे.


मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. बँकेच्या संचालक मंडळात एकूण २० सदस्य असून, त्यात आमदार प्रसाद लाड आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्यासारख्या भाजप नेत्यांचा समावेश आहे. उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत हेही संचालक मंडळात आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सहकार पॅनेलमधील जागावाटप आणि उमेदवारी निश्चितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Comments
Add Comment

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे. ज्या गावांमध्ये

Mahavitaran : महावितरणची राज्यभरात मोठी कारवाई, 3 दिवसांत 250 वीजचोरीची प्रकरणे उघड, 6.27 कोटींचा गैरवापर उघड

मुंबई  : राज्यात वीजचोरी आणि अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरणने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेत अवघ्या 3

रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीरामांचा अपमान खपवून घेणार नाही, हिंदु जनजागृती समिती आक्रमक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' चित्रपटात मूळ कथेचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीराम,

IAS officers Transfers : राज्यातील चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य शासनाने शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले.

Revenue Department : दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आता आयकर विभागाला जाणार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिल्यास

सैनिकी शाळांतील प्रवेश आता केवळ गुणवत्तेच्या आधारेच; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये पारदर्शक, उत्तरदायी आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्था निर्माण करण्यावर नव्या धोरणात भर