उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी; सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, सोशल मिडिया इन्फ्लुएंसर्स अन्...

उत्तर प्रदेशामध्ये झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय बैठकीनंतर, पक्षाकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 25 सुत्रीय अजेंडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्याद्वारे, पक्षाकडून विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष बांधणी सुरू आहे.

उत्तर प्रदेश: मथुरेमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन दिवसीय बैठकीनंतर, पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 25 सुत्रीय अजेंडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्याद्वारे, भाजप विधानसभा मतदारसंघापासून ते मंडल आणि बूथ स्तरापर्यंत आपली संघटना मजबूत करण्याची आणि सूक्ष्म- व्यवस्थापनाद्वारे सामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहे. जातीय गतिशीलतेची माहिती गोळा करणे, प्रभावशाली व्यक्तींना ओळखणे, नाराज नेते आणि कार्यकर्त्यांचे समाधान करणे, लाभार्थ्यांशी थेट संपर्क प्रस्थापित करणे आणि सोशल मीडियाद्वारे पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे यावर पक्षाचा सर्वाधिक भर आहे.


पक्षाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अजेंड्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या विविध विभागांमधील जातींची संख्या आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांची यादी तयार करण्यापासून ते स्थानिक कार्यकर्त्यांची प्रत्येक घरापर्यंत ओळख प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली व्यक्ती, सक्रिय महिला, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, व्यावसायिक आणि सामाजिक संघटनांशी संबंधित व्यक्तींची माहिती गोळा करण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. भाजपच्या 25 सुत्रीय अजेंड्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विधानसभा मतदारसंघातील सामाजिक आणि संघटनात्मक माहितीचे संकलन करणे. यामुळे प्रत्येक मतदारसंघातील प्रभावशाली व्यक्तींची ओळख पटेल.


या यादीमध्ये, 100 सक्रिय महिला कार्यकर्त्यांची यादीही तयार केली जाईल. प्रत्येक विभागातून 25 सक्रिय कार्यकर्त्यांची नावे गोळा केली जातील. प्रत्येक बूथमधून पाच सक्रिय आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची यादी तयार केली जाईल. या माध्यमातून पुढे विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यात येणार आहे. नाराज भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना ओळखून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येणार आहे. इतर राजकीय पक्षांतील नाराज कार्यकर्त्यांचीही यादी तयार करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघातील विजयी आणि पराभूत ग्रामप्रमुख तसेच इतर स्थानिक लोकप्रतिनिधींचा तपशील गोळा करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात विविध जातींची संख्या आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांची यादी तयार केली जाईल. या उपक्रमाद्वारे स्थानिक पातळीवरील सामाजिक गतिशीलता आणि राजकीय प्रभावाबद्दल माहिती गोळा करणे, हे पक्षाचे उद्दिष्ट आहे.






भाजपचा अजेंडा केवळ पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांपुरता मर्यादित नसून मतदार संघात राहणाऱ्या, त्यांच्या कामाविषयीची माहिती आणि विविध वर्गांतील लोकांची माहिती संकलित करण्याचाही समावेश आहे. यामध्ये कामानिमित्त आपल्या मतदारसंघाबाहेर राहणाऱ्या कर्मचारी आणि ग्रामसभा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या यादीचा समावेश असेल. मतदारसंघात कार्यरत असलेले सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित लोकांचीही माहिती गोळा केली जाईल. याव्यतिरिक्त, सक्रिय स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे मालक, प्रख्यात गायक, खेळाडू आणि इतर प्रमुख व्यक्तींची ओळख पटवली जाईल. कंत्राटदार, शिधावाटप विक्रेते, शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योगपती यांचीही यादी तयार केली जाईल. मतदारसंघातील मठ, मंदिरे आणि गुरुद्वारा यांचा तपशील गोळा करण्याची योजनाही अजेंड्यावर आहे.


भाजपाकडून आपल्या मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनही ह्या याद्या तयार करण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा आणि मागास वर्ग मोर्चा यांसह वेगवेगळ्या मंडळातील अध्यक्षांसह सभासदांना या संघटनात्मक कार्यात सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), डेअरी, सरकारी बँका आणि इतर सहकारी संस्थांच्या सदस्यांशी संपर्क साधण्याचीही योजना आखण्यात आली आहे. मतदारसंघातील विविध सामाजिक आणि व्यावसायिक गटांपर्यंत आपली संघटनात्मक पोहोच वाढवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. भाजपकडून 25 सुत्रीय अजेंड्यामध्ये बूथ स्तरावर संघटनात्मक कार्य वाढवण्यासाठी विशेष व्यवस्थांचाही समावेश आहे. याअंतर्गत, प्रत्येक बूथवर 11 बाईकस्वारांची नेमणूक केली जाणार आहे. हे कार्यकर्ते आठवड्यातून एकदा मोटारसायकल रॅली काढतील. याशिवाय, प्रत्येक बूथवर पाच ठिकाणी कमळाचे चिन्ह रंगवण्याची योजना आहे. लाभार्थ्यांच्या घरी चहा- नाश्त्यासाठी भेट देऊन संवाद आणि संपर्क वाढवण्याच्या सूचनांचाही या अजेंड्यात समावेश आहे. केवळ निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर बूथ स्तरावर नियमितपणे संपर्क साधण्यावर पक्षाचा भर आहे.


भाजपच्या अजेंड्यामध्ये अनुसूचित जाती आणि दलित मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी स्वतंत्र धोरणाचा समावेश आहे. यामध्ये दलित मतदारांमधून 10 नवीन सदस्यांची भरती करणे आणि अनुसूचित जातींमधील नवीन मतदारांची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. याव्यतिरिक्त, बूथ स्तरावर मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी एक सामाजिक संपर्क योजना विकसित केली जाईल. विविध भागांतील RSS कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना एका विशिष्ट वेळेत मतदान करता यावे, हे सुनिश्चित करण्याची योजना देखील अजेंड्यावर समाविष्ट आहे. भाजपच्या अजेंड्यामध्ये सोशल मीडिया हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 50 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची नावे गोळा केली जातील. पक्षाच्या सूत्रांनुसार, सरकार आणि पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी या इन्फ्लुएन्सर्सचा वापर करण्याची योजना आहे. एकूणच, मथुरा येथील सभेनंतर, भाजप या सूक्ष्म- व्यवस्थापनाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घटक आणि प्रभावशाली गटापर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहे.

Comments
Add Comment

मुंबई- वाराणसी फक्त 16 तासांत? मार्गावर ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन सुरू करण्याची मागणी

मुंबई: देशामध्ये ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे. ‘वंदे भारत’च्या दमदार

आजपासून बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर हाय- व्होल्टेज वीजपुरवठा सुरू होणार, पण ट्रेन केव्हापासून धावणार?

मुंबई: भारत देश वाहतूक क्षेत्रात नवा इतिहास रचण्याची तयारी वेगाने सुरू करत आहे. 2027 मध्ये मुंबई- अहमदाबाद हाय- स्पीड

Weather Alert: देशाच्या हवामानात मोठा बदल! ओडिशात ३ लाख नागरिकांचे स्थलांतर, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

देशाच्या पूर्व किनारपट्टीवर 'अक्वान' चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले असून, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये

गँगस्टर नसीम दुर्रानीचा गोळ्या झाडून खात्मा, नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली संयुक्त कारवाई

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर नसीम दुर्रानी याची गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले आहे. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त

2070 पर्यंत भारतातील मुस्लिम लोकसंख्या किती वाढणार; प्यू रिसर्चचा अंदाज काय सांगतो?

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत आगामी दशकांमध्ये बदल होण्याचा अंदाज एका चर्चित