मराठा व ओबीसी आंदोलक आमने-सामने

दीपक मोहिते


अंबड : अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असून पोलीसानी या मार्गावर बंदोबस्त वाढवला आहे.


मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने मराठा समाजाचे अनेक आंदोलक अंतरवली सराटीत दाखल होत आहेत.अंतरवली सराटीत जाण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं जेथे उपोषण सुरु आहे, त्या भागातून हा रस्ता जातो. त्यामुळे मराठा आंदोलकांच्या शेकडो गाड्या या रस्त्यावरून जात आहेत. त्यामुळे दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये तेथे चिथावणीखोर घोषणाबाजी होत आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.बीडमध्ये झालेल्या घटनेनंतर पोलिस समंजस भूमिका घेत, दोन्ही बाजूच्या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


दरम्यान घनसावंगी तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली.


वडीगोद्री येथून मनोज जरांगे यांच्या आंदोलकांच्या दिशेला गाड्या जात होत्या. त्याच दरम्यान आमच्या गाड्या सोडत नाहीत आणि त्यांच्या गाड्या का सोडतात? या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा आंदोलक समोरासमोर आले. प्रा. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्या दोघांचे उपोषणस्थळे एकमेकांच्या जवळ असल्यामुळे दोन्ही समाजाचे आंदोलक तेथे जमा होत आहेत.अनेक वेळा कार्यकर्ते आमनेसामने आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हजारो पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण परिसरात लावण्यात आला आहे.

Comments
Add Comment

सोमेश्वर कारखान्यावर विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ"

पुणे: सोमेश्वर कारखान्यावर मिळवलेला हा विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आहे अशा शब्दात आपल्या

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांची आढावा बैठक, प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्याचे दिले आदेश

नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी आरती व विविध शासकीय

Illegal Construction: राज्यातील अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी बंद, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: राज्यात सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत इमारती, झोनिंग न पाहता झालेले

राज्यातील महामार्गांवर नववर्षात ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि

रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ठाणेकरांच्या मनामध्ये असलेल्या

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला