सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांची आढावा बैठक, प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्याचे दिले आदेश

नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी आरती व विविध शासकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी सोपविलेली कामे समन्वयाने आणि जबाबदारीने पार पाडण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी आरती व विविध शासकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी सोपविलेली कामे समन्वयाने व जबाबदारीने पार पाडावी. प्रत्येक विभागाने स्वतःची जबाबदारी ओळखून समितीने सोपविलेली कामे स्वयंस्फूर्तीने पूर्ण करावीत. सुरक्षा, वाहतूक, वाहनतळ, पायाभूत सुविधा, आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता यांसह सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करून ते 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे, अशी सुचना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केली.



नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळा 31 ऑक्टोबर रोजी होत आहे. याच दिवशी गोदावरी आरती व अन्य शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनाच्या अनुषंगाने प्राधिकरणाच्या कार्यालयात आज दुपारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.


यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक बाबूलाल पाटील, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपायुक्त नियोजन योगेंद्र चौधरी, आरोग्य उपसंचालक डॉ कपिल आहेर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




सुरक्षा, वाहतूक व पायाभूत सुविधांचे नियोजन


आयुक्त सिंह म्हणाले की, सोहळ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे आगमन होणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करावे. पोलीस विभागाने बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, बॅरिकेटिंग आणि सुरक्षा पासेस याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. वाहनांची ये-जा, वाहनतळांची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण, व्हीव्हीआयपी मार्ग यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा. कार्यक्रमस्थळाची क्षेत्रीय पाहणी करून आवश्यक जागा निश्चित कराव्यात.


सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, व्यासपीठ, हेलिपॅड, बॅरिकेटिंग आणि इतर सुविधांचे नियोजन करावे. विद्युत व्यवस्था, मंदिर परिसरातील रोषणाई, पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक आरोग्य पथके नियुक्त करावीत. तसेच विश्रामगृहांच्या व्यवस्थेचेही नियोजन करावे. कार्यक्रमस्थळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असेही आयुक्तांनी निर्देशित केले.



विविध कार्यक्रमांच्या नियोजनावर भर


या बैठकीत आगामी कार्यक्रमांच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला. 17 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे ग्रामसभा, 20 ऑक्टोबर रोजी ‘हर घर कुंभध्वज’ उपक्रम, 25 ऑक्टोबर रोजी ‘शंखनाद’ गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स कार्यक्रम, तर 30 ऑक्टोबर रोजी ग्राम परिक्रमा व संयुक्त पाहणी नियोजित आहे. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी कालबद्ध नियोजन करावे. गर्दी नियंत्रण, वाहनतळ आणि भाविकांच्या सुविधांना विशेष प्राधान्य द्यावे. विविध धार्मिक संस्था व सर्व आखाड्यांना निमंत्रित करून त्यांच्या सहभागासाठी समन्वय साधावा, असेही बैठकीत सांगण्यात आले.




ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष तयारी


ध्वजारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने ध्वजस्तंभ, रामतीर्थ, कुशावर्त तीर्थ, मंदिर परिसर आणि नवीन घाट परिसरातील व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला. ध्वजस्तंभांची उंची, कार्यक्रमस्थळाची सजावट, विद्युत रोषणाई आणि आवश्यक पायाभूत सुविधांबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. ध्वजारोहणाचा कार्यक्रम दुपारी 12.02 वाजता नियोजित असून, सायंकाळच्या कार्यक्रमासाठी नागरीकांचे आगमन त्यानुसार प्रवेश, वाहतूक व गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले.


या सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध पथके गठित करण्यात आली असून, प्रत्येक पथकाने सोपविलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून कार्यक्रम निर्विघ्न, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सज्ज राहावे, असे आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले.


पोलीस महानिरीक्षक ऐनपुरे यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना केल्या. पोलीस आयुक्त कर्णिक यांनी कार्यक्रमासाठी बंदोबस्ताच्या नियोजनाबाबत सुचना केल्यात. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामतीर्थ परिसर स्वच्छता व गोदाआरती तयारीबाबत तर जिल्हाधिकारी प्रसाद यांनीही विविध विभागांनी करावयाच्या तयारीबाबत सूचना केल्या. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी वाहतूक मार्ग, वाहतुक नियंत्रण व वाहनतळ व्यवस्थापनाच्या नियोजनाची माहिती दिली. या बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी यांनी त्यांचेवर सोपविलेल्या जबाबदाऱ्यांनुसार केलेल्या तयारीची तसेच आवश्यक उपाययोजनांचीही माहिती बैठकीत दिली.

Comments
Add Comment

सोमेश्वर कारखान्यावर विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ"

पुणे: सोमेश्वर कारखान्यावर मिळवलेला हा विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आहे अशा शब्दात आपल्या

Illegal Construction: राज्यातील अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी बंद, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: राज्यात सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत इमारती, झोनिंग न पाहता झालेले

राज्यातील महामार्गांवर नववर्षात ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि

रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ठाणेकरांच्या मनामध्ये असलेल्या

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

हा विजय म्हणजे सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी - सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला विश्वास

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत