Nitesh Rane : ...तर उबाठाने स्वत:च्या ताकदीवर महाराष्ट्राची निवडणूक लढवावी!

आमदार नितेश राणे यांचे खुले आव्हान


मुंबई : संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) काल रात्री मारलेल्या ९०चा परिणाम अजूनही उतरला नाही, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होतं. काल हरियाणामध्ये भाजपाचं (BJP) दाबून पराभव होतोय, असं घसा सुखेपर्यंत ओरडून बोलणाऱ्याला हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील एकही जागा जिंकता आली नाही, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला. तसेच संजय राऊतच्या मालक म्हणजे उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) बोचरी टीका करत स्वत:च्या ताकदीवर महाराष्ट्राची निवडणूक लढवा, असे खुले आव्हान दिले आहे.


हरियाणा राज्यामध्ये भाजपाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तर जम्मू काश्मीरमध्येही सर्वात जास्त वोट शेअर म्हणजे २९.१६ टक्के हा भाजपा पक्षाचा आहे. याबद्दलचं दु:ख संजय राजाराम राऊतच्या चेहऱ्यावर आज सकाळी पत्रकार परिषदेत दिसून येत होतं. ज्या दहा जनपथला काँग्रेस पक्षाची मम्मी बसते त्यांना साधं हरियाणा जिंकता आलं नाही. तसेच जम्मू काश्मीरमध्येही केवळ सहा सीट मिळाल्या म्हणून आज सामनातील अग्रलेखासह पत्रकार परिषदेतून संजय राजाराम राऊत काँग्रेसला मोठे डोळे वटारुन दाखवत होता. त्यामुळे संजय राजाराम राऊतने त्याच्या आणि मालकामध्ये हिंमत आणि लायकी असेल तर मविआमधून बाहेर येवून स्वत:च्या जोरावर, जीवावर, ताकदीवर महाराष्ट्राची निवडणूक लढवून दाखवा, असे खुले आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.



उबाठाची तुलना भाजपा सोबत करण्याची लायकी नाही


हरियाणामध्ये स्वत:च्या ताकदीवर भाजपा पक्ष सत्तेवर आला आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या सर्व हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपा पक्षाला मतदान केलं. महायुती हा निवडणुका स्वत:च्या हिंमतीवर जिंकतो. महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन जिंकत नाही. त्यामुळे उबाठाची तुलना भाजपासोबत करण्याची तुमची लायकी नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी विरोधकांना लगावला.


त्याचबरोबर संजय राजाराम राऊतने त्याची आणि त्याच्या मालकाने ढुंगणात ताकद असेल तर यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला महाराष्ट्रातील २८८ जागा स्वत:च्या ताकदीवर लढणार हे जाहीर करावे. उगाच फुशारक्या मारुन दुसऱ्यांना सल्ले देण्याचं काम बंद करावे, असेही नितेश राणे यांनी म्हटले.



उबाठा आणि काँग्रेस मनोरंजनाचं साधन


काँग्रेसने उबाठाला आणि उबाठाने काँग्रेसला सल्ले देणं म्हणजे वर्गातले दोन 'ढ' विद्यार्थी एक दुसऱ्याला मार्गदर्शन करतात असंच समज आहे. कारण लोकसभेमध्ये उबाठा आणि हरियाणा व जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नापास झालेला आहे. हे दोन्ही 'ढ' विद्यार्थी आपापसात भांडून स्वत:चेच कपडे फाडतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यांना केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहते, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; मोदी आणि मुर्मू यांना देणार खास मूर्तिभेट

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या

Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

CHM College: उल्हासनगरचा विकास आराखडा तयार होणार! सिंधी बांधवांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया लवकरच

ठाणे: उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम)