Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर निघाले आहेत. भारत दौऱ्यात नेपाळी पंतप्रधान बालेंद्र शाह हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. भारत-नेपाळ संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी बालेंद्र शाह यांच्या आगमनानंतर त्यांचे स्वागत केलं. नेपाळच्या पंतप्रधान पदाची धुरा मार्च 2026 मध्ये स्वीकारल्यानंतर शाह यांचा हा पहिलाच भारत दौरा असून पंतप्रधान म्हणूनही त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून काठमांडू नवी दिल्लीसोबतच्या संबंधांना किती महत्त्व देते हे दिसून येतं आहे. नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागळे, परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल, पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यंजनकर आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह शाह आज सकाळी दिल्लीसाठी रवाना झाले होते.
बालेन शाह हे पीएम मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांना नेपाळच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेल्या दोन अत्यंत खास मूर्तिभेट देणार आहेत. या भेटीदरम्यान बालेन शाह देणार असलेल्या दोन्ही भेटवस्तू भारत आणि नेपाळमधील प्राचीन सांस्कृतिक नात्याची साक्ष देणाऱ्या आहेत. बालेन शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रातो मच्छिंद्रनाथ यांची मूर्ती भेट म्हणून देणार आहेत. नेपाळच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीशी हे दैवत अत्यंत खोलवर जोडलेले आहे. तसेच काठमांडू खोऱ्यात त्याची प्रमुख देवता म्हणून पूजा केली जाते. पारंपरिक मान्यतेनुसार, लिच्छवी राजवंशाचे राजा नरेंद्र देव यांनी रातो मच्छिंद्रनाथ यांना सध्याच्या आसाममधून काठमांडू खोऱ्यात आणले होते.
Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू
Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. ...
तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काठमांडूच्या चाबाहिल येथील चारुमती विहार मठाशी संबंधित एक विशेष मूर्ती भेट दिली जाणार आहे. या विहाराचा इतिहास थेट मौर्य सम्राट अशोक आणि त्यांची कन्या चारुमती यांच्याशी जोडलेला आहे. सम्राट अशोक आपल्या मुलीसोबत काठमांडू खोऱ्यात आले होते. पुढे चारुमती यांनी तेथील स्थानिक राजपुत्र देवपाल यांच्याशी विवाह केला आणि देवपाटन परिसरात या विहाराची स्थापना केली, अशी ऐतिहासिक मान्यता आहे. ती भाटवस्तू स्वरूपात मुर्मू यांना देण्यात येणार आहे.
Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू
Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. ...