Railway Block : रविवार, सोमवार कसारा स्टेशनवर विशेष ब्लॉक !

प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ लाईन्सच्या विस्ताराच्या कामाला वेग


मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) कसारा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ लाईन्सच्या विस्तारासाठी आणि रुंदीकरणासाठी कसारा स्टेशनवर एनआई कामांसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी ३.२० ते सोमवार सकाळी १.२० वाजेपर्यंत २२ तासांचा असेल.


या ब्लॉकचा कालावधी डाऊन लाइन रविवार १०.४० ते दुपारी १.४० वाजेपर्यंत (३ तास) आणि अप लाईन रविवार दुपारी १२. ४० वाजता ते दुपारी १. ४० वाजता (रविवार) (१ तास) आणि अप आणि डाउन लाईन्स एकत्रित रविवारी संध्याकाळी ७.२० वाजेपासून सोमवारी सकाळी १. २० वाजेपर्यंत (६ तास) असेल.


रविवारी धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्स्प्रेस गाड्या रद्द राहतील. नागपूर-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस शनिवारी नाशिक रोड येथे रद्द होइल व जबलपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस शनिवारी मनमाड येथे संपेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम रविवारी नाशिक रोड येथून संध्यकाळी ६. ३० वाजता सुटेल व ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नाशिक रोड दरम्यान रद्द होईल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर गरीबरथ एक्सप्रेस रविवारी मनमाड येथून संध्याकाळी ५.५५ वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मनमाड दरम्यान रद्द होईल. बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस , अमृतसर-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, गोरखपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस कुशिनगर एक्सप्रेस, जयनगर - लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस छपरा - पनवेल विशेष, शालिमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस, शनिवारी जळगाव - नंदुरबार- भेस्तान - वसई रोड मार्गे वळवल्या जातील.



या ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम



  • रविवारी ८ सेवा रद्द केल्या जातील.

  • २२ सेवा योग्य स्थानकांवर अल्पावधीत बंद होतील.

  • २२ सेवा योग्य स्थानकांवर कमी होतील.

Comments
Add Comment

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध

Yachting Championship: समुद्राच्या लाटांवर रंगली यॉटिंगची स्पर्धा; 121 नौकानयनपटूंनी दाखवले कौशल्य

मुंबईच्या समुद्रकिनारी राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला. देशातील विविध भागांतून आलेल्या

विधान भवन आणि एअर इंडिया इमारतीजवळील खाद्य स्टॉल्सवर FDAचा दंड; ज्यूस स्टॉलचा परवाना निलंबित

विधान भवन आणि नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीच्या परिसरात कार्यरत असलेले खाण्याचे स्टॉल्स आणि खाद्य

Better Roads For Dharavi: धारावीतील खराब रस्त्यांची होणार सुधारणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी शहरांसह उपनगरांतील डांबरी रस्त्यांसह जुन्या