निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मतदानोत्तर जनमत चाचणी (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.


राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केल्यानुसार, २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज आयोजित करणे आणि प्रकाशित करणे किंवा प्रसारित करण्यास (एक्झिट पोल) प्रतिबंध करण्यात आलेला आहे.


तसेच मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेआधी ४८ तासांच्या कालावधीत निवडणुकीशी संबंधित मजकूर दाखविण्यास तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणतेही ओपिनियन पोल किंवा निवडणूक सर्वेक्षण अंदाज प्रदर्शित करण्यास मनाई असेल, असे भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: "MPSC विद्यार्थ्यांनो निश्चिंत राहा, सरकार तुमच्या पाठीशी", मंत्री नितेश राणे यांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या

Nagpur Water Cut: नागपूर शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना बसणारा फटका? वाचा यादी

नागपूर: नागपूर शहरामध्ये काही परिसरांमध्ये येत्या आठवड्यात पाणी पुरवठा बंद असणार आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या

'महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा २०२६': शेतात राबणाऱ्या हातांना मिळाला 'शेतकरी' म्हणून कायदेशीर दर्जा

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. २

Legislative Council Election : मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; पुणे आणि नागपूरच्या उमेदवारांची नावं समोर

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या

Nagpur accident : नागपुरात भीषण अपघात; ट्रेलरच्या धडकेत पती-पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नागपूर : वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाने घेतली उघडीप; 4 ऑक्टोबरला राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज

मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा