राहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल


सातारा : कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणाच्या निवडणुकीत काँग्रेसने आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु,आश्वासने पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासने द्या, असे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष असे म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासन पाळू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटं बोलणारी फॅक्टरी आहे. तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये, असे आवाहनही शाह यांनी केले.


कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, "अग्निवीर ही तरूणांना बेकार करणारी नाही तर सैन्य दलाला तरूण करणारी योजना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक अग्निवीराला परत आल्यानंतर केंद्र सरकार सीएपीएफ आणि महाराष्ट्र सरकार पेन्शनची नोकरी देईल. हे भाजपाचे आश्वासन आहे आणि मोदींची आश्वासने फसवी नसतात. मोदी बोलतात ते करतात."

अयोध्येतील राम मंदिराचा विषय काँग्रेसनं ७५ वर्षे लटकवत,भटकवत ठेवल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. "नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अयोध्यामध्ये मंदिराचं भूमीपूजन करून थांबलो नाही, तर मंदिर बांधून दाखवलं. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर सर्व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आणला असला तरी राहुल गांधींची चौथी पिढीसुध्दा ३७० कलम पुन्हा लागू करू शकणार नाही," असा सज्जड इशाराच शाहांनी दिला.

"जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा पुरावा मागणाऱ्यांनी टीव्हीवर पाकिस्तानी नेत्यांची पडलेली तोंड पाहिली असती तरी पुरावे मिळाले असते," असा उपरोधिक टोला अमित शाहांनी राहुल गांधींना लगावला. "तसेच मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला बहुमत मिळालं होतं. परंतु, शिवसेनेनं जनादेशाला धोका दिला. हिंदुत्ववाद्यांना पाखंडी म्हणणाऱ्या, श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार जाऊन बसले," अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली. "शरद पवार या वयात देखील खोटं बोलतात. राज्यात गुंतवणूक आली नसल्याचे ते सांगत आहेत. वास्तविक देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली असल्याचं अमित शाहांनी ठणकावून सांगितलं. महायुतीच्या काळात समृध्दी महामार्ग, मेट्रो, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, महिला, शेतकरी, तरूणांसाठी योजना राबवल्या. त्यासारखं महाविकास आघाडीच्या काळातील एखादं काम शरद पवारांनी सांगावं," असं आव्हानही शाह यांनी दिले.

Comments
Add Comment

Dr Sampada Munde Suicide Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; गृह विभागाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात

Maharashtra Weather Update : पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' १३ जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा इशारा

मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आता मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याकडे सर्वांचे

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल