Share Market: सेन्सेक्स, निफ्टीत किंचित वाढ, पण तज्ज्ञांनी दिला मंदीचा इशारा

मुंबई : भारतीय शेअर बाजारात (Share Market) अलीकडेच प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. उच्चांकावर झेप घेतलेल्या सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकात आता मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसत असून गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा आला आहे. बेंचमार्क स्टॉक इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टीने बुधवारी पाच महिन्यांची नीचांकी पातळी गाठल्यानंतर आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात माफक वाढ दिसून येत आहे. तथापि, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील निराशाजनक कमाई आणि सतत परकीय प्रवाहाने दलाल स्ट्रीटला दबावाखाली ठेवले आहे, आघाडीचे निर्देशांक आता त्यांच्या सप्टेंबरच्या शिखरांवरून १० टक्क्यांनी खाली आले आहेत. यामुळे बाजारातील तज्ज्ञ तात्पुरत्या पुलबॅकची अपेक्षा करतात, परंतु चालू असलेल्या प्रतिकूल मूलभूत घटकांमुळे नजीकच्या काळात बाजार खाली जाणारा कल कायम राहण्याची शक्यता व्यक्त करतात.


सकाळी ९:४५ वाजता सेन्सेक्स १४२.८२ अंकांनी किंवा ०.१८ टक्क्यांनी वाढून ७७,८३३.७७ वर आणि निफ्टी ३०.७० अंकांनी वाढून २३,५८९.७० वर होता. १,७४० शेअर्स वाढले आणि १,२२४ शेअर्स घसरले आणि ११८ शेअर्स अपरिवर्तित झाल्यामुळे मार्केट (Share Market)  ब्रेड्थ लाभधारकांच्या बाजूने होती.



शेअर मार्केट डाउन असल्यामुळे गुंतवणूकदारांचे झाले मोठे नुकसान


देशांतर्गत शेअर बाजारात झालेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदार आणि व्यापा-यांना गेल्या महिनाभरात मोठ्या पडझडीला तोंड द्यावे लागले. गुंतवणूकदारांना आणखी एका पडझडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मागील सलग दोन दिवस शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले तर संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १४ लाख कोटी रुपयांहून अधिक घट नोंदवली गेली आहे.



बाजारातील (Share Market) सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बीएसईचे मार्केट कॅप ४,४४,७१,४२९.९२ कोटी रुपये होते जे बुधवारी ४,३०,४५,५३३.५४ कोटी रुपयांवर घसरले. म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे नोव्हेंबर महिन्यात १४,२५,८९६.३८ कोटी रुपयांचे नुकसान झाले.


रुपयाची विक्रमी घसरण, परदेशी गुंतवणूकदारांची माघार आणि वाढत्या महागाईच्या आकड्यांनी शेअर मार्केटमध्ये दबाव वाढला आहे असे तज्ज्ञांना वाटते. याशिवाय येत्या काही दिवसांत देशांतर्गत शेअर बाजारात घसरण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या निर्देशांकातील तेजी आणि शेअर बाजारातून एफआयआयची माघार यामुळे रुपयात होणारी पडझड महत्त्वाचे कारण असून बाजार पुन्हा एकदा ७५ हजार रुपयांच्या पातळीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात