वाचा आजचे हवामान वृत्त
मुंबई : हिवाळी मोसमाला (Winter Season) सुरुवात झाली असून मागील दोन दिवसांपासून काहीशी थंडी लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी हवेत गारवा जाणवत असला तरीही नागरिकांना दुपारी उन्हाची झळ (Heat) सोसावी लागत आहे. मात्र हे चढ उताराच्या वातावरणापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वत्र थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. (Weather Update Today)
सध्या महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे. किमान तापमान हे ११ अंशापर्यंत घसरले आहे. आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाब अंदाज वर्तवला आहे.
कोणत्या भागात गारवा?
जळगाव, महाबळेश्वर आणि पुण्यातील तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे तेथे काहीसा गारवा जाणवू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही रात्री हवेत गारवा जाणवत आहे.
मुंबईत उन्हाचा कडाका
मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सध्या उन्हाचा चटका अधिक आहे. तरी राज्यात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)