विदर्भात रोजगाराचा प्रश्न असल्याने येथील लाखो तरुण रोजगारासाठी पुणे,बंगरूळूला जातात. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राजकीय पक्ष त्यांना स्वखर्चाने नागपुरात आणतात आणि पोचवून देतात. लोकसभा निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला. म्हणून विधानसभा निवडणुकीत तो करण्यात आला. मात्र अमरावतीत बस अडकल्याने मतदार युवक संतापले. टोलच्या पैशावरून वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. सकाळी ८ पर्यंत बसेस अमरावतीत अडकून होत्या.ठरल्या वेळेनुसार त्या सकाळी ६ ला नागपुरात येणार होत्या.