NIA Action : जम्मू-काश्मिरात एनआयएची छापेमारी!

जम्मू : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज दहशतवादी घुसखोरी प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये धाडी टाकल्यात. यावेळी एनआयएने निमलष्करी दल (Paramilitary Force) आणि पोलिसांच्या मदतीने राज्यात एकाच वेळी ८ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये रियासी, उधमपूर, रामबन, किश्तवाड आणि डोडाचा समावेश आहे.



मागील काही दिवसांमध्‍ये राज्‍यात घुसखोरीच्‍या प्रकारात वाढ झाली आहे. त्‍याची गंभीर दखल घेत राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ही कारवाई केली आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी 'एनआयए'ने दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरवल्‍याप्रकरणी जम्मूच्या बजलहटा येथे साहिल अहमद याच्‍या घरावर छापा टाकला होता. तपासादरम्यान एनआयएला साहिल अहमदच्‍या खात्यात १५ लाख रुपये संशयास्पदरित्या जमा झाल्याचे आढळले होते. अहमदाबादच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समाविष्ट असलेल्या हुमायून खान नावाच्या फरारी गुन्हेगाराने १५ लाख रुपयांची ही रक्कम जमा केल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले होते.


साहिल अहमद याचा काका गुलजार अहमद मलिक १९९२ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बनला होता, असे एनआयएच्या तपासात समोर आले होते.. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तानातील सियालकोट येथे राहत होता. एनआयआयएच्या टीमने साहिल आणि त्याच्या काही नातेवाईकांचीही चौकशी केली होती. (NIA Action)

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि