Sukanya Mone : सुकन्या मोने यांना यशवंत-वेणू पुरस्कार जाहीर!

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) कोथरूड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत-वेणू पुरस्काराने प्रसिद्ध अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने (Sukanya Mone) यांचा गौरव केला जाणार आहे.



स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिन आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्काराचे यंदाचे ७ वे वर्ष असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम उद्या सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सुहास जोशी यांना या प्रसंगी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार, उद्योजक अमित गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘तो राजहंस एक’ हा संगीतकार श्रीनिवास खळे संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंदार आपटे आणि मनिषा निश्चल गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन दीपक गुप्ते, दीपक पवार, गिरीष गोडबोले करीत असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Comments
Add Comment

Ranbir Kapoor Angry: "खूपच बोलतोयस तू..." पापाराझीचं वागणं पाहून रणबीर कपूर भडकला; Video Viral

मुंबई: अभिनेता रणबीर कपूर सध्या 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर' या अपकमिंग चित्रपटामुळे चांगलाच प्रकाशझोतात आहे. सध्या

Madhuri Dixit : माधुरीच्या ‘कोण होणार करोडपती’ची सातासमुद्रापार क्रेझ; चाहत्यांची प्रतीक्षा संपली, तारीख जाहीर

मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका अगदी नव्या आणि रंजक भूमिकेतून

Anjali Anand News: “वजन कमी कर, त्यानंतर...”, कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्रीला दिलेला सल्ला; म्हणाली, “अभिनय सोडण्याचा…”

मुंबई: अभिनेत्री म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर पटकन स्लिम- ट्रीम असलेली अभिनेत्री नजरेसमोर येते. पण त्याला अपवाद

Ramayana Movie Update : 'रामायण' चित्रपटातील 'रॉकिंग स्टार' यशचा रावणाचा राजेशाही लूक प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

मुंबई : चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित असा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी

Awarapan 2 OTT Release : 'इम्रान हाश्मी'चा सुपरहिट सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार! ‘आवारापन 2’ची OTT रिलीज डेट जाहीर

मुंबई : 'इम्रान हाश्मी'च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. थिएटरमध्ये दमदार कमाई करणारा ‘आवारापन 2’ आता OTTवर दाखल

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर