DPIFF Awards 2026: पुरस्कार सोहळ्यात ‘धुरंधर’ची हवा! रणवीर-अक्षयने मारली बाजी

DPIFF Awards 2026 मध्ये 'धुरंधर' चित्रपटाने सहा पुरस्कार पटकावत पुरस्कार सोहळ्यावर वर्चस्व गाजवले. रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर अक्षय खन्नाला नकारात्मक भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला. याशिवाय 'सैयारा', 'कांतारा' आणि 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या कलाकृतींनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

बॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर'ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२६ मध्ये या चित्रपटाने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात 'धुरंधर'ने तब्बल सहा पुरस्कारांवर आपले नाव कोरले. अभिनेता रणवीर सिंह, अक्षय खन्ना आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा गौरव करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात 'धुरंधर'चा दबदबा पाहायला मिळाला.


मुंबईत 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार आणि तंत्रज्ञ सहभागी झाले होते. भारतीय मनोरंजन विश्वातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना यावेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. केवळ बॉलीवूडच नव्हे, तर प्रादेशिक चित्रपट, ओटीटी, टेलिव्हिजन आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रातील योगदानाचीही दखल घेण्यात आली.(DPIFFAwards2026)



रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाचा विशेष गौरव


'धुरंधर' चित्रपटातील अभिनयासाठी रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती. त्याच्या अभिनयातील विविध पैलूंचे कौतुक करण्यात आले. दुसरीकडे, अक्षय खन्नाने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेलाही विशेष पसंती मिळाली. त्याच्या प्रभावी अभिनयासाठी त्याला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनाही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. चित्रपटाची कथा, मांडणी, कलाकारांची निवड आणि तांत्रिक बाजू यामुळे 'धुरंधर'ने प्रेक्षकांवर प्रभाव निर्माण केला. चित्रपटाच्या संगीतासाठी शाश्वत सचदेव यांनाही पुरस्कार मिळाला. अशा प्रकारे अभिनयापासून दिग्दर्शन आणि संगीतापर्यंत अनेक विभागांत 'धुरंधर'ने आपली छाप सोडली.(Dhurandhar)







'सैयारा' आणि 'कांतारा'नेही मारली बाजी


या पुरस्कार सोहळ्यात 'धुरंधर'सोबतच इतर चित्रपटांचाही गौरव करण्यात आला. 'सैयारा' या चित्रपटासाठी अभिनेत्री अनीत पड्डा हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुक केले होते. तसेच 'सैयारा'मधील गाण्यालाही विशेष पुरस्कार मिळाला. गायक फहीम अब्दुल्ला आणि गीतकार इरशाद कामिल यांचाही सन्मान करण्यात आला.


दुसरीकडे, 'कांतारा : चॅप्टर 1' या चित्रपटानेही पुरस्कार सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाला समीक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला. अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांना समीक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. अभिनेत्री यामी गौतम हिलाही 'हक' चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.(Ranveer Singh)







ओटीटी विश्वातील कलाकारांचाही सन्मान


चित्रपटांसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय कलाकृतींचीही यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात दखल घेण्यात आली. अभिनेता आर्यन च्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सीरिजला सर्वोत्कृष्ट वेब सीरिजचा पुरस्कार मिळाला. याशिवाय आर्यनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. 'पाताल लोक सीझन २'मधील अभिनयासाठी जयदीप अहलावत यांना, तर 'दिल्ली क्राइम सीझन ३'साठी शेफाली शाह यांना पुरस्कार मिळाला.(Akshay Khanna)



आंतरराष्ट्रीय कलाकारांचीही पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती


यंदाच्या DPIFF Awards मध्ये आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रातील योगदानाचीही दखल घेण्यात आली. प्रसिद्ध पॉप गायिका टेलर स्विफ्ट हिला 'इंटरनॅशनल आर्टिस्ट ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांना जागतिक चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी गौरवण्यात आले.


एकूणच, DPIFF Awards 2026 मध्ये विविध चित्रपट आणि कलाकारांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. मात्र, सहा पुरस्कार पटकावणाऱ्या 'धुरंधर'ने यंदाच्या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतले. रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयापासून ते आदित्य धर यांच्या दिग्दर्शनापर्यंत चित्रपटाच्या प्रत्येक महत्त्वाच्या बाजूला मिळालेली दाद ही या चित्रपटाच्या यशाची आणखी एक पोचपावती ठरली आहे.(Dadasaheb Phalke Awards)

Comments
Add Comment

Maherchi Sadi Sequel: ‘माहेरची साडी 2’ बनला तर लक्ष्मी आणि विकी कोण? अजिंक्य देव यांनी सुचवली कलाकारांची नावं

Maherchi Sadi Sequel: 90च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'माहेरची साडी' हा चित्रपट. 1991

Om Operation Mole: धनुषच्या ‘ओम’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग

Om Operation Mole: धनुषचा 'ओम' आणि जपानी मॉन्स्टर चित्रपट 'गॉडझिला मायनस झिरो' हे दोन मोठे चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित

Bollywood Entertainment News: भाईजानने श्रद्धा कपूरची मागितली माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची बॉक्स ऑफिस टक्कर

Bollywood Entertainment News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट

Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी,

OM MOVIE REVIEW : 'पुष्पा'लाही मागे टाकणार ? धनुष-ममूटींचा 'OM: Operation Mole' चित्रपटगृहात दाखल; वाचा प्रेक्षकांचा पहिला रिव्ह्यू!

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार धनुष, ममूटी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका

Bigg Boss 20 Extension: TRP चा धमाका! 'बिग बॉस 20' आणखी 2 ते 4आठवडे वाढणार?

Bigg Boss 20 Extension: सर्वाधिक चर्चेत असणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. 6 सप्टेंबर 2026 रोजी सुरू