Avinash Isha Breakup Rumours: आधी अनफॉलो, आता एकत्रचे फोटोही डिलीट! ईशा-अविनाशच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

बिग बॉस 18च्या घरात टीव्ही अभिनेता अविनाश मिश्रा आणि अभिनेत्री ईशा सिंग दोघांना लोकप्रियता मिळाली. सध्या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच दोघांमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या.

Avinash Isha Breakup Rumours: बिग बॉस 18च्या घरात टीव्ही अभिनेता अविनाश मिश्रा आणि अभिनेत्री ईशा सिंग दोघांना लोकप्रियता मिळाली. सध्या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच दोघांमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या. सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यापासून ते ईशाच्या आईच्या कथित व्हॉइस नोटपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा रंगली. आता या सर्व चर्चांवर अविनाशने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.



प्रत्येकाच्या खासगी आयुष्याचा आदर करा


अविनाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले आहे, ‘मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टी मागे सोडून पुढे जाऊया. मागील काही आठवडे अनेकांसाठी कठीण होते. सर्व मीडिया पेजेसना विनंती आहे की, प्रत्येकाच्या खासगी आयुष्याचा आदर करा. नातेसंबंध हे वैयक्तिक असतात, ते सार्वजनिक मनोरंजनाचा विषय नाहीत. प्रत्येक गोष्ट ही व्ह्यूज आणि एंगेजमेंटसाठी नसते. लोकांना शांततेत जगू द्या.’ अविनाशने त्याच्या या पोस्टमध्ये कुठेही ईशाचे नाव घेतलेले नाही. शिवाय, दोघांचं ब्रेकअप झालं आहे की नाही, याबाबतही कोणतंही स्पष्ट विधान केलेलं नाही. मात्र, त्याच्या या पोस्टमुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.


त्यानंतर आता दोघांनी सोशल मीडियावरील एकत्र फोटो डिलिट केले आहेत. तसेच व्हायरल झालेल्या ईशाच्या आईच्या कथित व्हॉईस नोट दोघांनीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय, ब्रेकअपच्या चर्चांवर सार्वजनिक प्रतिक्रिया दोघांपैकी कोणीही दिलेली नाही.






अविनाशने ‘खतरों के खिलाडी 15’ हा शो जिंकल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीत ईशाचं कौतुक केलं होतं. यावेळी त्याने ईशाला ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं होतं. त्यानंतर ‘पती पत्नी और पंगा 2’ च्या सेटवरही दोघांनी आपल्या नात्याबद्दल स्पष्ट संकेत दिले. अविनाशने आपण केवळ चांगले मित्र नसून त्यापेक्षा अधिक असल्याचं सांगितलं होतं. मात्र, या कबुलीनंतर काही दिवसांतच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या.





">अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांची पहिली भेट सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 18’ या रिॲलिटी शोमध्ये झाली. ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये दोघांची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांच्यातील जवळीक आणि एकमेकांसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडायला लागली. शो संपल्यानंतरही दोघं अनेकवेळा एकत्र दिसले. त्यांनी ‘काला छा काला’, ‘आओ ना’ आणि ‘हीरिये’ यांसारख्या म्युझिक व्हिडीओंमध्ये एकत्र काम केलं. त्यामुळे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Tags
entertainment newsisha singhTelevision NewsAvinash MishraCelebrity Relationship NewsAvinash Mishra Isha SinghAvinash Isha Breakup RumoursAvinash Mishra StatementIsha Singh Latest NewsAvinash Isha Unfollow
Comments
Add Comment

Prachi Desai: दीड वर्षांनंतर प्राची देसाई सोशल मीडियावर परतली! ‘Proof of existence’ म्हणत शेअर केले फोटो

[caption id="attachment_1077497" align="alignnone" width="800"] अभिनेत्री प्राची देसाई एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर सोशल मीडियावर परत आली आहे, तिने

DPIFF Awards 2026: पुरस्कार सोहळ्यात ‘धुरंधर’ची हवा! रणवीर-अक्षयने मारली बाजी

बॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर'ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म

Maherchi Sadi Sequel: ‘माहेरची साडी 2’ बनला तर लक्ष्मी आणि विकी कोण? अजिंक्य देव यांनी सुचवली कलाकारांची नावं

Maherchi Sadi Sequel: 90च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'माहेरची साडी' हा चित्रपट. 1991

Om Operation Mole: धनुषच्या ‘ओम’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग

Om Operation Mole: धनुषचा 'ओम' आणि जपानी मॉन्स्टर चित्रपट 'गॉडझिला मायनस झिरो' हे दोन मोठे चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित

Bollywood Entertainment News: भाईजानने श्रद्धा कपूरची मागितली माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची बॉक्स ऑफिस टक्कर

Bollywood Entertainment News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट

Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी,