Bangladesh : आसाममधील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी

आसाम : बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारतात अनेक ठिकाणी निषेध केला जात आहे. यातच आता, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले जोवर बंद होत नाहीत, तोवर कोणत्याही बांगलादेशी नागरिकाला आपण आपल्या सेवा देणार नाही, अशी घोषणा आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी घेतली आहे.



या जिल्ह्यांतील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी 


आसाममधील बराक खोऱ्यातील कछार, श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) आणि हायलाकांडी (Hailakandi) या ३ जिल्ह्यांमध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बराक व्हॅली हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबुल राय शुक्रवारी (6 डिसेंबर 2024) पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या परिस्थितीत जोवर सुधार होत नाही आणि हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोवर आम्ही शेजारील देशाच्या कोणत्याही नागरिकाला बराक खोऱ्यातील ३ जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे ठेवणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. हा आमचा निषेध व्यक्त करण्याचा मार्ग आहे.”



हिंदूंवरील अत्याचाराचा विरोध 


पुढे ते म्हणाले, “देशात पुन्हा एकदा स्थिरता परत येईल, यासाठी बांगलादेशातील नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत. परिस्थितीत सुधारणा झाली, तरच आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो." गेल्या काही दिवसांपूर्वी, बजरंग दलाने सिलचर येथे आयोजित जागतिक प्रदर्शनाच्या आयोजकांना शेजारील देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बांगलादेशी उत्पादनांची विक्री करणारे २ स्टॉल बंद करण्यास सांगितले होते आणि त्यांची मागणी मान्य करण्यात आली होती.


या शिवाय, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघही (RSS) १० डिसेंबर २०२४ रोजी दिल्लीच्या सिव्हिल सोसायटीच्या बॅनरखाली बांगलादेश दूतावासावर मोर्चा काढणार असल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment

Modi Xi Jinping talks : ‘सीमेवर शांतता आणि स्थैर्य हीच द्विपक्षीय संबंधांची प्राथमिक अट’; पंतप्रधान मोदींचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट संदेश

नवी दिल्ली: भारत आणि चीन संबंधांमध्ये सुधारणा व सहकार्याचा नवा अध्याय सुरू करण्याच्या प्रयत्नांदरम्यान,

BRICS Summit : मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचे लक्षवेधी हस्तांदोलन; बदलत्या जागतिक राजकारणाचे संकेत

नवी दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे

Indoor News : इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत ब्युटीशियनचा संशयास्पद मृत्यू; ४० मिनिटे सोबत असणारा 'तो' व्यक्ती कोण ?

इंदोर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indoor News) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित हॉटेलमधील

Xi Jinping New Delhi Speech : मध्य पूर्व युद्ध रोखण्यासाठी ब्रिक्सने मध्यस्थी करावी; नवी दिल्लीतील परिषदेत शी जिनपिंग यांचे आवाहन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत बोलताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मध्य

India UAE Ties : ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अबू धाबीच्या युवराजांची महत्त्वपूर्ण भेट; भारत-यूएई संबंधांवर भर

नवी दिल्ली: १८ व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने १२ सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबू धाबीचे

Ramdas Athawale : महाबोधी महाविहारमुक्तीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन

नवी दिल्ली: बुद्धगयेतील ऐतिहासिक महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्ध धर्माच्या ताब्यात असावे आणि त्याचे सर्व