मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.



छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती पंतप्रधान मोदी यांना भेट


पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर, श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती पंतप्रधान मोदी यांना भेट दिल्याबाबतच्या भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वावर प्रकाश टाकत, पंतप्रधान श्री. मोदी यांची शिवाजी महाराजांवर अपार श्रद्धा असल्याचे सांगितले. पंतप्रधान श्री.मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली निष्ठा आणि आदरभाव व्यक्त केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना दिली.


या भेटी दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकास योजनांबाबत पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केल्याबाबत सांगितले. या चर्चेदरम्यान पंतप्रधान श्री. मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य असल्याचे सांगत, राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून सर्वत्तोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मूल्ये आणि त्यांचे प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल माध्यमांशी संवाद साधताना, पंतप्रधान मोदींनी वर्ष 2014 मध्ये रायगडावरून निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान श्री.मोदी यांचे मार्गदर्शन आणि प्रेम हे महाराष्ट्राला सतत प्रेरणा देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.


या दोन दिवसीय दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्याही सदिच्छा भेटी घेतल्या. या भेटी मध्ये राज्याच्या विकासासाठी विविध योजनांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त

2070 पर्यंत भारतातील मुस्लिम लोकसंख्या किती वाढणार; प्यू रिसर्चचा अंदाज काय सांगतो?

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत आगामी दशकांमध्ये बदल होण्याचा अंदाज एका चर्चित

दिल्ली विमानतळावर सुरक्षा भेदून आत घुसण्याचा प्रयत्न! CISF जवानांनी काही सेकंदांत पकडला तरुण

नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे सुरक्षा यंत्रणेला चकमा देत

PUC Certificate : 10 वर्षांपेक्षा जुन्या बीएस-4 आणि बीएस-6 वाहनांसाठी दर 6 महिन्यांनी पीयूसी चाचणी अनिवार्य; नियमात बदल

PUC Certificate : वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) वैधतेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन

बलरामपूरमध्ये दाट धुक्याचा कहर! भीषण अपघातात 3 तरुणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2

AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…"एक दिवस सुटलो तर..."

AI च्या धोक्यांबाबत नेहमीच चर्चा होत असते. आता एका नव्या प्रकरणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका युजरने