WhatsApp : सॅमसंग, सोनी, मोटारोला, एचटीसी, एलजीसह या आयफोनमध्ये १ जानेवारीपासून व्हॉट्सॲप सपोर्ट होणार बंद

मुंबई : १ जानेवारीपासून सॅमसंग, सोनी, मोटारोला, एचटीसी, एलजीसह आयफोनच्या या स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सॲप (WhatsApp) बंद होणार आहे. या लिस्टमध्ये तुमचा फोन तर नाही ना? मेटाने एक यादी शेअर केली आहे. यादीमध्ये दिलेल्या स्मार्टफोन्सवर १ जानेवारी २०२५ पासून व्हॉट्सॲप बंद होणार आहे. अनेक जुन्या फोनला या निर्णयाचा फटका बसणार आहे.


मेटाने जाहीर केले आहे की, १ जानेवारी २०२५ पासून व्हॉट्सॲप (WhatsApp) काही स्मार्टफोनवर काम करणे बंद करणार आहे. या स्मार्टफोनची यादी देखील मेटाने शेअर केली आहे. या यादीमध्ये सॅमसंग आणि एचटीसीच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.


किटकॅट किंवा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर १ जानेवारीपासून व्हॉट्सॲप बंद होणार आहे. अँड्रॉईड किटकॅट २०१३ मध्ये रिलीझ झाले होते. परंतु आता बहुतेक फोन नवीन वर्जनचा वापर करतात. त्यामुळे मेटाने निर्णय घेतला आहे की १ जानेवारीपासून व्हॉट्सॲप किटकॅट किंवा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनवर काम करणार नाही. याची यादी देखील कंपनीने शेअर केली आहे.


यादीत सॅमसंग, सोनी, मोटारोला, एचटीसी, एलजीसह आयफोनचा समावेश आहे. अनेक जुन्या फोनला या निर्णयाचा फटका बसणार असून त्यात सॅमसंग, एलजी आणि सोनी यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या काही जुन्या मॉडेल्सचा समावेश आहे. हे फोन १० वर्षांहून अधिक काळापासून बाजारात उपलब्ध आहेत.


कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर आता वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये अँड्रॉइडच्या नवीन वर्जनवर अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे जेणेकरून ते व्हॉट्सॲप वापरू शकतील.


दरम्यान, मेटाने जुन्या फोनवर व्हॉट्सॲप बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. व्हॉट्सॲपचा वापर करताना युजर्सना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.



या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सॲप होणार बंद


Samsung: Galaxy S3, Galaxy Note 2, Galaxy Ace 3, Galaxy S4 Mini


Motorola: Moto G (1st Gen), Razr HD, Moto E 2014


HTC: One X, One X+, Desire 500, Desire 601


LG: Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90


Sony: Xperia Z, Xperia SP, Xperia T, Xperia V


अँड्रॉईडशिवाय जुन्या iOS फोनवर देखील व्हॉट्सॲप (WhatsApp) सपोर्ट बंद होणार आहे. तुम्ही आयफोनचे iOS 15.1 पेक्षा जुने वर्जन वापरत असाल, तर ५ मेनंतर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे. या निर्णयाचा परिणाम iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus सारख्या जुन्या फोनवर होणार आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी