Credai MCHI : क्रेडाई-एमसीएचआय 'स्त्री आवास' योजनेद्वारे महिला घर खरेदीदारांना सक्षम बनवण्याच्या तयारीत!

भारतातील पहिला ‘क्विक रिअल इस्टेट मॉल’ लॉन्च करणार; घर खरेदीमध्ये येणार नवक्रांती


मुंबई :  क्रेडाई-एमसीएचआय (Credai MCHI) मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे प्रतिनिधीत्व करणारी सर्वोच्च संस्था, भारतातील पहिल्या क्विक रिअलच्या लॉन्चसह आगामी ३२ व्या क्रेडाई-एमसीएचआय प्रॉपर्टी आणि होम फायनान्स एक्सपोची वाट पाहत आहे. इस्टेट मॉलची नवी व्याख्या तयार होणार आहे. १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये याबाबत कार्यक्रम आयोजित केला जाणार असून यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी आणि खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले घर खरेदीसाठी चांगला अनुभव मिळू शकणार आहे.



या वर्षीच्या एक्स्पोमध्ये पिंक संडेवर विशेष भर देण्यात येणार आहे. म्हणजेच एमसीएचआय स्त्री आवास योजनेद्वारे महिला घर खरेदीदारांना सक्षम बनविण्यावर केंद्रित असलेला समर्पित उपक्रम आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील पारदर्शकता, विश्वास आणि सशक्तीकरण यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनानुसार घराची मालकी अधिक समावेशक आणि महिलांसाठी सुलभ बनविण्याची क्रेडाई-एमसीएचआयची वचनबद्धता आहे.


या परिवर्तनाच्या उपक्रमाविषयी बोलताना, क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमिनिक रोमेल म्हणाले, “क्विक रिअल इस्टेट मॉल ही प्रक्रिया सुव्यवस्थित करून आणि अनन्य वैशिष्ट्ये सादर करून रिअल इस्टेट क्षेत्रात परिवर्तन करण्याच्या आमच्या दृष्टीचे प्रतिबिंब आहे , आम्ही घराची मालकी अधिक सुलभ बनवत आहोत, विशेषत: प्रथमच खरेदी करणाऱ्यांसाठी ही भारतीय रिअल इस्टेटमधील नवीन युगाची सुरुवात आहे.


त्याचपुढे “हा एक्स्पो खरेदीदारांना एक अतुलनीय अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ५ हजारहून अधिक चॅनल भागीदारांचा सहभाग असणाऱ्या फ्रायडे ॲम्बेसेडर्स कनेक्टपासून ते सुपर सॅटर्डे सेलपर्यंत अनन्य डीलची ऑफर देण्यासाठी, सहभागी सर्वांना लाभ मिळावा यासाठी आम्ही आकर्षक उपक्रमांची योजना आखली आहे.” असे त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Mumbai Local : गोरेगाव रेल्वे स्थानकावर महिलेचा मोटरमन केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकावर एका महिलेने थेट

मुंबईतील 'मिनी वाराणसी'मध्ये देव दिवाळीच्या दिवशी भव्य महाआरतीचे आयोजन, महाआरतीने उजळणार परिसर!

मुंबई: दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या ऐतिहासिक बाणगंगा तलाव पुन्हा एकदा भक्तीच्या रंगात न्हाऊन

दाऊदच्या जुन्या घरावर बुलडोझर! मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई

मुंबई: अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमच्या घरावर मुंबई महानगर पालिकेने हातोडा चालवला आहे. दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार

बॉलीवूड कलाकारांची मुंबई पोलिसांकडे धाव, कोणत्या सेलिब्रिटीला X-कॅटेगरी सुरक्षा मिळणार?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना वारंवार फोनवरून किंवा ई-मेलच्या

‘पादचारी प्रथम' : विलेपार्ले महात्मा गांधी मार्गावरील ६५० मीटर लांबीचा पदपथ झाला अडथळामुक्त

मुंबई ( विशेष प्रतिनिधी): पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त

Dahisar Demolition: दहिसर येथील पाटीलवाडी परिसरात रस्ता झाला मोकळा रुंदीकरणामुळे 19 बांधकामे हटवली

मुंबई  (विशेष प्रतिनिधी) : रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने