बॉलीवूड कलाकारांची मुंबई पोलिसांकडे धाव, कोणत्या सेलिब्रिटीला X-कॅटेगरी सुरक्षा मिळणार?

धमक्यांचं प्रमाण लक्षात घेता काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेमध्ये वाढ करण्याची विनंती केली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना वारंवार फोनवरून किंवा ई-मेलच्या माध्यमांतून धमक्या मिळत आहे. धमक्यांचं प्रमाण लक्षात घेता आता काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबई पोलिसांकडे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची विनंती केली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांकडे X कॅटेगरीची सुरक्षा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेसाठीचे अर्जांची मुंबई पोलिसांकडून छाननी केली जात आहे. बॉलिवूड कलाकारांची मागणी लक्षात घेऊन मुंबई पोलीस सेलिब्रिटींच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याच्या तयारीमध्ये आहे. नेमक्या कोणकोणत्या कलाकारांना X कॅटेगरीची सुरक्षा मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफवर दोन अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यामध्ये अभिनेता थोडक्यात बचावला मात्र दोघे जण जखमी झाले होते. त्याच दरम्यान, इतरत्र बॉलिवूड सेलिब्रिटींनाही धमकीचे ईमेल आणि फोन आले होते. असं असताना मुंबई पोलिसांकडून अनेक सेलिब्रिटींच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, आमिर खान, रणवीर सिंह, आयुष्मान खुराना आणि तुषार कपूरसह अनेक कलाकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचे प्रमाण लक्षात घेता काही सेलिब्रिटींनी मुंबई पोलिसांकडे X कॅटेगरीची सुरक्षा मिळण्याची विनंती केली आहे.






मुंबई पोलीस संरक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलिब्रिटींनी केलेल्या अर्जांची छाननी केली जात आहे. पोलिसांकडून धमक्यांचे स्वरूप, त्यांची विश्वासार्हता आणि कलाकारांना असलेला संभाव्य धोका यांचे मूल्यांकन केल्यानंतरच सुरक्षा व्यवस्थेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कलाकारांना 'X कॅटेगरी'ची सुरक्षा देण्याच्या पर्यायावरही चर्चा सुरू आहे. शिवाय, कोणत्याही कलाकाराच्या सुरक्षेबाबत अद्याप अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या कलाकारांना सध्याच्या घडीला धमकी मिळत असल्यामुळे सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे.






दरम्यान, आयुष्मान खुरानाला मिळालेल्या धमकीप्रकरणी बंगळूरुमधील वैभव मिश्रा नावाच्या आयटी व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर खलिस्तान समर्थकांकडून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना मिळालेल्या धमक्यांमुळे चित्रपटसृष्टीत चिंता वाढली आहे. जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेला गोळीबार, तसेच सलमान खान, अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ, रणवीर सिंग, रणबीर कपूर, तुषार कपूर आणि आमिर खान यांना मिळालेल्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता वाढली आहे. पोलीस सुद्धा सध्याच्या घडीला सतर्क झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळी, बब्बर खालसा, अनिल पंडित, हॅरी बॉक्सर आणि गोल्डी ढिल्लन यांसह अनेक गुंडांची चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्या कलाकारांना कोणत्या कॅटेगरीची सुरक्षा आवश्यक आहे, हे निश्चित करण्याचे काम मुंबई पोलीस सध्या करत आहे.

Comments
Add Comment

‘पादचारी प्रथम' : विलेपार्ले महात्मा गांधी मार्गावरील ६५० मीटर लांबीचा पदपथ झाला अडथळामुक्त

मुंबई ( विशेष प्रतिनिधी): पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त

Dahisar Demolition: दहिसर येथील पाटीलवाडी परिसरात रस्ता झाला मोकळा रुंदीकरणामुळे 19 बांधकामे हटवली

मुंबई  (विशेष प्रतिनिधी) : रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने

Khanna House Worli: वरळीतील खन्ना हाऊसच्या पुनर्विकास प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वरळीतील खन्ना कंस्ट्रक्शन हाऊस कमर्शियल प्रिमायसेस संस्थेच्या पुनर्विकास प्रस्तावाला

मुख्यमंत्र्यांच्या सूचना अन् महापालिका सभागृह भरले घड्याळाच्या काट्यावर; काल नेमकं BMC च्या सभागृहात काय घडलं

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे सभागृह हे मागील काही महिन्यांपासून नियोजित वेळेत सुरु न करता एक ते

धारावीतील लोकमान्य टिळक महापालिका अखत्यारीत डायलिसिस सेंटरच्या खासगीकरणाला विरोध; सुधार समितीने प्रस्ताव फेटाळला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धारावी येथील छोटा शीव रुग्णालयातील डायलिसीस केंद्राच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सुधार

आरे कॉलनतील आदिवासी जनतेला घराजवळ आरोग्य सुविधा, आरे रुग्णालय ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): आरे कॉलनीतील आदिवासी जनतेसह स्थानिकांना आरोग्य सेवा आता मिळणार असून आरे रुग्णालय