राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार ! - चंद्रशेखर बावनकुळे 

राज्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान अभियान


नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपाचे दीड कोटी सदस्य करू, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या नवी दिल्लीतील केंद्रीय कार्यशाळेत व्यक्त केला. दरम्यान,याच कार्यशाळेत महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी दिवसभर ही कार्यशाळा झाली. संघटनेच्या विस्तारावर देशव्यापी चर्चा झाली. देशभरातील सर्व राज्यांचे प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटन मंत्री, प्रमुख पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी बावनकुळे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. पक्षाचे मुंबई अध्यक्ष श्री आशीष शेलार यांचाही सत्कार कऱण्यात आला.



महाराष्ट्राची संघटनात्मक माहिती


राज्यात सुरु झालेले सदस्यता नोंदणी अभियान व त्या विषयाचे नियोजन याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर निवेदन व सादरीकरण केले. १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान अभियान राज्यभरात राबविणार असून, पाच जानेवारीला विशेष अभियान घेण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपासून बूथ कार्यकर्त्यापर्यंत संपूर्ण संघटना बूथ वर सदस्यता नोंदणी करणार आहे. नवीन वर्षात १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश महा अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.



सन्मान कार्यकर्त्यांना अर्पण


सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, आजचा हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा तर आहेच आहे, पण पार्टीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा, पार्टी नेतृत्वाने दिलेल्या दायित्वाची पूर्णतः करणारा तसेच फलश्रुती असलेला आहे.आजचा सत्काराचा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवत आहे. हा सन्मान मी माझ्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी, गृहमंत्री श्री अमितभाई शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कष्टाचा माझ्या आजच्या यशात खूप मोठा वाटा आहे, याची मला जाणीव आहे. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरले अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

PM Modi FICCI Speech : स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा विचार घराघरांत न्या; 'फिक्की'च्या संमेलनात पंतप्रधान मोदींचे उद्योजकांना स्पष्ट आवाहन

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये देशाला स्वदेशी वस्तूंचा वापर आणि आत्मनिर्भरतेचा जो मूलमंत्र दिला

Indira Gandhi Jayanti : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी आणि डी. के. शिवकुमार यांचे विनम्र अभिवादन

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी पंतप्रधान

'Hii' पाठवा अन् PF ची A टू Z माहिती मिळवा; नोकरदारांकडून EPFO च्या व्हॉट्सॲप सेवेला सर्वाधिक पसंदी

मुंबई: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता

GTA 6 च्या लाँचशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोडला भारताचा विकास; 13 वर्षांच्या प्रगतीचा मांडला आढावा

गेमप्रेमींसाठी गेल्या 13 वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गुरुवारी मध्यरात्री बहुप्रतिक्षित 'ग्रँड

अकवान चक्रीवादळाचा ओडिशाला धोका; 46 हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी हलवले

अकवान चक्रीवादळाने अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील अकवान या तीव्र चक्रीवादळाचा

पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणं महागात! भर पेट्रोल टँकरसमोर दुचाकीला आग; तरुण गंभीर जखमी

हैदराबाद : पेट्रोल पंपावर इंधन भरताना सिगारेट ओढल्याने मोठी दुर्घटना घडल्याची घटना हैदराबादमधील कुकटपल्ली