पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणं महागात! भर पेट्रोल टँकरसमोर दुचाकीला आग; तरुण गंभीर जखमी

हैदराबादच्या कुकटपल्ली येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना सिगारेट ओढल्याने दुचाकीला आग लागली. 25 वर्षीय तरुण गंभीर भाजला. त्याचवेळी टँकरमधून इंधन उतरवले जात असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती; मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली.

हैदराबाद : पेट्रोल पंपावर इंधन भरताना सिगारेट ओढल्याने मोठी दुर्घटना घडल्याची घटना हैदराबादमधील कुकटपल्ली येथे समोर आली आहे. मंगळवारी दुपारी एका दुचाकीला अचानक आग लागली. या घटनेत 25 वर्षीय दुचाकीस्वार गंभीर भाजला असून, मोठा स्फोट होण्याची शक्यता असताना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी कुकटपल्ली येथील पेट्रोल पंपावर आला होता. यावेळी त्याने सिगारेट पेटवली आणि अचानक दुचाकीने पेट घेतला. काही क्षणांत आगीच्या ज्वाळा दुचाकीला वेढू लागल्याने पेट्रोल पंप परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने जळती दुचाकी पंप परिसरातून बाहेर हलवली. त्यानंतर अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर भाजल्याने त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.








पेट्रोल टँकरमध्ये इंधन उतरवण्याचे काम सुरू होते


विशेष म्हणजे, दुर्घटना घडली त्यावेळी पेट्रोल पंपावर तेलाचा टँकर भूमिगत साठवण टाक्यांमध्ये इंधन उतरवत होता. आग टँकरपर्यंत पोहोचली असती, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने इंधन उतरवण्याची प्रक्रिया थांबवली. त्यामुळे आग टँकरपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पेट्रोल पंपावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पेट्रोल आणि डिझेलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या परिसरात सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारची आग निर्माण करणारी वस्तू वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. घटनेबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाच्या 'अल्बाट्रॉस' पथकाने पूर्ण केली सुवर्णमहोत्सवी 50 वर्षे; हिंदी महासागरावर अविरत पहारा

भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्यशाली इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. भारतीय नौदलाच्या दीर्घ पल्ल्याच्या

Manipur News : मणिपूरमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळले; कॅप्टनचा मृत्यू, 3 जवान गंभीर जखमी

मणिपूर : मणिपूरच्या पूर्व इम्फाळ जिल्ह्यात लष्करी जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत कोसळल्याने एका कॅप्टनचा

Vande Bharat Express : नातेवाईकांना निरोप देण्यासाठी वंदे भारतमध्ये चढले अन् अडकले! 12 जणांना 36,000 रुपयांचा दंड

उत्तर प्रदेश : रेल्वे प्रवासात नातेवाईकांना निरोप देण्यासाठी ट्रेनमध्ये चढणे 12 जणांना चांगलेच महागात पडले.

Pax Silica : सेमीकंडक्टरपासून सुपर इंटेलिजन्सपर्यंत... भारतासह १० देशांचा AI पुरवठा साखळी सुरक्षित करण्याचा ऐतिहासिक निर्णय!

आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ मनोरंजनाची किंवा साधी संगणकीय सुविधा राहिलेली नाही, तर ती

AI महासत्तेकडे भारताची मोठी झेप! अमेरिका आणि 8 देशांसोबत 'Pax Silica' करार; भारताला काय फायदा?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आता फक्त संगणकापुरता विषय राहिलेला नाही. ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि

Yogi Aditynath : “भूतकाळ लक्षात ठेवला तरच भविष्य सुरक्षित राहील” : ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सविस्तर स्पष्टीकरण

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, मुख्यमंत्री योगी