उंदरांना घरापासून दूर ठेवणारे पाच प्रभावी उपाय

मुंबई : गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत येणारी उंदीर मामाची मूर्ती अनेकांना आवडते. आरती म्हणताना अलिकडे गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय असं म्हणणाऱ्यांची संख्याही वाढत चाललीय. पण हा हवाहवासा वाटणारा उंदीर मामा जेव्हा सजिव रुपात खरंच घरात शिरतो तेव्हा कोणालाही नको असतो.



घरात एकदा उंदीर शिरला की लवकर बाहेर जात नाही. उंदराने घरात प्रवेश केला की नुकसान होण्यास सुरुवात होते. उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी मग पिंजरा लावणे, उंदीर चिकटून राहील असे चिकट कागद वापरणे, उंदरांचा बंदोबस्त करणाऱ्या वड्या घरात ठिकठिकाणी ठेवणे हे प्रकार सुरू होतात. पण माणसांप्रमाणेच उंदीरही हल्ली हुशार झाले आहेत. सहजपणे अशा सापळ्यात अडकतील याची खात्री देता येत नाही. मात्र काही प्रभावी घरगुती उपाय केले तर उंदरांचा बंदोबस्त करणे शक्य आहे. हे उपाय वाजवी दरात आणि सहज करणे शक्य आहे. हे उपाय करुन बघा आणि उंदरांचा बंदोबस्त करा.



१. कांद्यामुळे होईल उंदराचा वांदा : ज्या भागात उंदराचा वावर आहे त्या भागात कांदा ठेवा. कांदा खाल्ल्यावर उंदराचा मृत्यू होतो किंवा उंदीर त्रास होऊ लागल्यामुळे घरातून बाहेर पडतो.

२. वापरा थोडा बेकिंग सोडा, उंदराला पळवा : साखर, बेकिंग सोडा, गहू पीठ हे तीन घटक समप्रमाणात घ्या आणि त्यापासून मळून छोटे गोळे तयार करा. हे गोळे ज्या भागात उंदराचा वावर आहे त्या भागात ठेवा. यातील एखादा गोळा खाल्ल्यावर उंदराचा मृत्यू होतो किंवा उंदीर त्रास होऊ लागल्यामुळे घरातून बाहेर पडतो.

३. काळी मिरी उंदरांचा बंदोबस्त करी : काळ्या मिरीचे दाणे अथवा काळी मिरी पावडर ज्या भागात उंदराचा वावर आहे त्या भागात ठेवा. काळी मिरी खाल्ल्यामुळे उंदराचा मृत्यू होतो किंवा उंदीर त्रास होऊ लागल्यामुळे घरातून बाहेर पडतो. काळी मिरी मिश्रीत पाणी फवारणीच्या बाटलीत भरून उंदरावर फवारले तरी उंदीर घरातून बाहेर पळून जाण्याची शक्यता वाढते.

४. उंदरांवर प्रभावी असलेले तेल : पेपरमिंट ऑईल, लेमन ऑईल, सिट्रेनेला ऑईल यापैकी कोणतेही एक तेल फवारणीच्या बाटलीत भरून उंदरावर फवारले तरी उंदीर घरातून बाहेर पळून जाण्याची शक्यता वाढते. तसेच पेपरमिंट ऑईल, लेमन ऑईल, सिट्रेनेला ऑईल यापैकी कोणत्याही एका तेलात बुडवलेले कापसाचे बोळे उंदरांचा वावर असलेल्या भागात ठेवा. या तेलांच्या उग्र वासाने उंदीर घरातून बाहेर पळून जाण्याची शक्यता वाढते.

५. रोपांचा उपाय : लव्हेंडर आणि डॅफोडिलची रोपं घरात लावा. या रोपांमुळेही उंदरांचा बंदोबस्त करणे शक्य आहे. ज्या भागात उंदरांचा वावर आहे त्या भागात तमालपत्र ठेवले तर उंदीर त्या भागाच्या आसापस फिरकत नाही.
Comments
Add Comment

दाऊदच्या जुन्या घरावर बुलडोझर! मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई

मुंबई: अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमच्या घरावर मुंबई महानगर पालिकेने हातोडा चालवला आहे. दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार

बॉलीवूड कलाकारांची मुंबई पोलिसांकडे धाव, कोणत्या सेलिब्रिटीला X-कॅटेगरी सुरक्षा मिळणार?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना वारंवार फोनवरून किंवा ई-मेलच्या

‘पादचारी प्रथम' : विलेपार्ले महात्मा गांधी मार्गावरील ६५० मीटर लांबीचा पदपथ झाला अडथळामुक्त

मुंबई ( विशेष प्रतिनिधी): पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त

Dahisar Demolition: दहिसर येथील पाटीलवाडी परिसरात रस्ता झाला मोकळा रुंदीकरणामुळे 19 बांधकामे हटवली

मुंबई  (विशेष प्रतिनिधी) : रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने

Khanna House Worli: वरळीतील खन्ना हाऊसच्या पुनर्विकास प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वरळीतील खन्ना कंस्ट्रक्शन हाऊस कमर्शियल प्रिमायसेस संस्थेच्या पुनर्विकास प्रस्तावाला

मुख्यमंत्र्यांच्या सूचना अन् महापालिका सभागृह भरले घड्याळाच्या काट्यावर; काल नेमकं BMC च्या सभागृहात काय घडलं

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे सभागृह हे मागील काही महिन्यांपासून नियोजित वेळेत सुरु न करता एक ते