छत्तीसगड : चकमकीत एकूण २७ नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी चकमकीत आतापर्यंत २७ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत पोलिसांनी १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगितले.


छत्तीसगडमधून नक्षलवादाचे समूळ उच्चाटनाच्या दिशेने सरकारने कंबर कसली आहे. त्यानुसार सुक्षादलाच्या १००० जवानांनी छत्तीसगड- ओडिशा सीमेवरील गरियाबंद येथे नक्षलवाद्यांना घेराव घालतला. यावेळी सुरक्षा दलांनी नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. मात्र नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर पोलिसांनी सडेतोड प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांचा मुकाबला सुरू केला. या प्रदीर्घ चकमकीत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.


यापरिसरात अजूनही पोलिसांची कारवाई सुरूच असून आणखी नक्षलवादी या ठिकाणी असल्याची माहिती समोर आली आहे. ठार केलेल्या २७ नक्षलवाद्यांपैकी १६ जणांचे मृतदेह ताब्यात घेत त्यांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या चकमकीत 1 कोटींचे बक्षीस असलेला जयराम उर्फ ​​चलपती ठार झाला असून यासह सीसीएम मनोज आणि गुड्डू नक्षलवादीही ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती रायपूर झोनचे आयजी अमरेश मिश्रा यांनी दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही नक्षलवादी या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षादल हा परिसर पिंजून काढत आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि