Matheran Fire : माथेरानच्या गारव्यात अग्नितांडव!

रायगड : माथेरान मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान घाटात आज बर्निंग कारचा थरार (Matheran Fire) पाहायला मिळाला. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरानला पर्यटकांची मंदियाळी पाहायला मिळते आहे. माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाट चढत असताना अचानक आग लागली. या आगीत कार चालक आणि त्याची प्रेयसी अडकली होती. प्रसंगावधान राखत जीव मुठीत घेऊन दोघांनीही आपला जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारली. टनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले होते. तर दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखण्यात आल्याने घाटात पर्यटकांच्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.


नवी मुंबई बेलापूर येथील राहणारे ऍड. सचिन सोनावळे हे आपल्या खासगी डस्टर चारचाकी वाहनातून माथेरान फिरण्यासाठी म्हणून प्रेयसी सोबत आले होते. नेरळ येथून माथेरान घाट चढत असताना गारबट येथील रस्त्याच्या चढावावर अचानक कारच्या पुढील इंजिन बाजूने धूर निघायला लागला. आणि काही क्षणातच आगीने पेट घेतला. दरम्यान वाहन चालवणारे ऍड. सोनवणे यांनी लागलीच हुशारी दाखवत रस्त्याच्या कडेला कार पार्क करून दोघे बाहेर पडले. यावेळी जीव मुठीत घेवून पळणारे सोनवणे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. तर स्थानिक वाहन चालक नागरिकांनी यावेळी धाव घेत त्यांना बाजूला करीत त्यांचे प्राण वाचविले आहे.


आग आटोक्यात आणण्यासाठी माथेरान नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी येण्यासाठी फोन केला असता वाहन चालवण्यासाठी हक्काचा नियोजित चालकच नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान माथेरान अग्निशमन वाहनास तात्पुरता चालक मिळाल्यावर दोन तासानंतर हे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. (Matheran Fire)

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेतरस्ते, जलसंधारणासाठी लोकप्रतिनिधींनी निधी वापरावा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदारांसोबत बैठक

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार आणि खासदारांनी आपला निधी मृदसंधारण, चारा

Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रखडलेली मदत मिळवण्यासाठी 2 महिन्यांची मुदत

मुंबई :  शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे अद्याप जमा झाले नसल्या

Nagpur Winter Session: नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 ते 18 डिसेंबरदरम्यान

मुंबई: राज्य विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन 7 ते 18 डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. बुधवारी

वैशाली आणि रूपाली हॉटेलनंतर पुण्यातील खाऊ गल्लीतल्या विक्रेत्यांवरही FDA ची धाड, 5 आस्थापनांना दिली 'व्यवसाय बंद'ची नोटीस

पुणे: सुट्टीच्या अनेक पुणेकरांच्या नाश्त्याची सोय होणाऱ्या सुप्रसिद्ध वैशाली आणि रुपाली या हॉटेलवर अलीकडेच FDA

Pune Crime: रिक्षेतून MD विक्रीचा प्रयत्न उधळला! मार्केटयार्डमध्ये तिघे ताब्यात

पुणे शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मार्केटयार्ड परिसरात

IAS Transfer: तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

मुंबई: राज्य शासनाने तीन वरिष्ठ भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुन्हा एकदा काल