नागपुरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 ते 18 डिसेंबरदरम्यान

राज्य विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन 7 ते 18 डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मुंबई: राज्य विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन 7 ते 18 डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. बुधवारी विधानभवनात झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, जलसंधारणाची कामे आणि शेतकऱ्यांना मदत या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही विशेष घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर बनला आहे.






जलसंधारणाच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी, दुष्काळी उपाययोजना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून करण्यात येणारी मदत या विषयांवर विरोधकांकडून सरकारला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. विदर्भाचा अनुशेष, विकासकामांसाठी निधी आणि प्रलंबित प्रश्न यांवरही अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय कर्जतमधील वृक्षतोड आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांचे मुद्देही चर्चेत येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

इन्स्टाग्रामवर ओळख अन् मुंबईत भेटीचा प्लॅन! झारखंडहून एकट्या आलेल्या 17 वर्षीय मुलीचा GRP ने घेतला शोध

मुंबई: सोशल मीडियावर केलेली फ्रेंडशिप एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतली आहे. इयत्ता 12 वी मध्ये शिकत असलेल्या

Mumbai BEST Bus Fire: ससून डॉकजवळ बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने आग नियंत्रित

Mumbai BEST Bus Fire: मुंबईतील कुलाबा येथील ससून डॉकजवळ आज, बुधवार 18 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी मार्ग क्रमांक 139 च्या बेस्ट बसला आग

Mumbai Airport News: ना विमान, ना माहिती! मुंबई विमानतळावर स्पाईसजेटच्या प्रवाशांचा संताप

Mumbai Airport News: देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून

Dawood House Demolition: भेंडी बाजारातील दाऊदच्या घरावर महापालिकेची कारवाई; धोकादायक इमारत जमीनदोस्त होणार

Dawood House Demolition: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर ऐतिहासिक आणि गर्दीचा भाग म्हणून ओळखला जातो. यंत्रमाग उद्योगाची राजधानी,

BSc Nursing College: बीएससी नर्सिंग कॉलेजच्या समोर उबाठा आडवे

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील

BMC च्या मालमत्ता कर वसुलीसाठी व्हॉट्सअप आणि गुगल मेसेजचा वापर करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मालमत्ताधारकांना सुविधा देण्यासाठी