झी स्टुडिओजचा नवा सिनेमा येतोय, 'आता थांबायचं नाय!'चे दमदार टायटल पोस्टर लाँच!

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित 'झी स्टुडिओज्', 'चॉक अँड चीज फिल्म्स' आणि 'फिल्म जॅझ' निर्मित 'आता थांबायचं नाय!' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


वेगवान रस्त्यावरील एका भिंतीवर तीन ठसठशीत रंगांत लिहिलेले 'आता थांबायचं नाय!' हे शीर्षक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच स्फूर्ती देते. या प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमधून ऐकू येणारे जादुई संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करत कमालीचे आकर्षण तयार करीत आहे. दर्जेदार मराठी चित्रपट महाराष्ट्रातील रसिकांच्या मनामनात आणि घराघरात रुजवणाऱ्या 'झी स्टुडिओज्'ची प्रस्तुती असलेली ही, या वर्षातील सर्वात मोठी घोषणा, 'झी स्टुडीओज् मराठी'चे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी नुकतीच केली.


'झी स्टुडीओज्', 'चॉक अँड चीज फिल्म्स' आणि 'फिल्म जॅझ' निर्मित 'आता थांबायचं नाय!' या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते शिवराज वायचळ यांनी केले आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रमुख भुमिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे तसेच एका खास भूमिकेत रोहिणी हट्टंगडी आणि एका कर्तबगार, संवेदनशील अधिकाऱ्याच्या भूमिकेत आशुतोष गोवारीकर यांना आपण पाहणार आहोत.


 


'झी स्टुडिओज्' प्रस्तुत 'आता थांबायचं नाय!' या चित्रपटाचे लेखन शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी केले असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते उमेश के बन्सल(झी स्टुडिओज्), निधी परमार - हिरानंदानी(चॉक अँड चीज फिल्म्स'), क्रिएटिव्ह प्रोड्युसर - तुषार हिरानंदानी, धरम वालीया(फिल्म जॅझ) हे सर्व एकत्र आले आहेत.


'आता थांबायचं नाय!' ही सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारी सत्यकथा पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह १ मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊया आणि या प्रेरणादायी प्रवासाचे साक्षीदार होऊया!

Comments
Add Comment

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण