मुंबईतील आमदार निवासाला भीषण आग!

मुंबई: मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाला आज पहाटे भीषण आग लागण्याची घटना घडली. मंत्रालयाच्या मागील बाजूस असलेल्या या इमारतीतील हिंगोली जिल्ह्याचे आमदार संतोष बांगर यांच्या खोली क्रमांक ३१३ मध्ये ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, खोलीतील एसीमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच ही आग लक्षात आल्याने आणि अग्निशामक दलाने तातडीने कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळी आग लागल्याचे समजताच सुरक्षारक्षकांनी खोलीतील सर्वांना सुरक्षित स्थळी हलवले आणि तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.



या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करताना आमदार निवासातील सुरक्षा व्यवस्थेच्या दुर्लक्षावर आक्षेप घेतला. "आग लागण्याची घटना अनपेक्षित असते, मात्र आमदार निवासात अग्निशमन यंत्रणा असूनही ती निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले आहे. इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही, यावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.


ही घटना इमारतीतील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारी असून, यावर प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Uniform Cibil Code: समान नागरी कायद्यावर मुंबईत जनसुनावणी; नागरिकांना मते मांडण्याची संधी!

समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांचे विचार आणि मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात विभागीय स्तरावर

BMC Hospitals: महानगरपालिकेच्या रूग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना ३ दिवसांत मिळणार जन्माचा दाखला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित चार प्रमुख रूग्णालये आणि १६ उपनगरीय रूग्णालये याठिकाणी

डॉ. थंगजम धबाली सिंह यांना ‘वन इंडिया पुरस्कार-२०२६’ प्रदान; तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते गौरव

मुंबई : मणिपूरमध्ये आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती, पर्यटन आणि भारत-जपान मैत्रीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान

Ritu Tawde in Bhandup: भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्यांची महापौरांनी घेतली दखल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्‍या तातडीने मार्गी

मागील 15 वर्षांपासून प्रलंबित कांदिवली पश्चिम येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल 27 बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

MSRTC Record Collection: लालपरीची दिवाळी जोरात! एका दिवसात कमावले 46.53 कोटी रुपये

मुंबई:  दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासोबतच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र